जैश-ए-मोहम्मदचा कमांडर सज्जाद भटचा जवानांकडून खात्मा
एबीपी माझा वेब टीम | 18 Jun 2019 05:07 PM (IST)
जैश-ए-मोहम्मद या संघटनेतील दहशतवादी सज्जाद भट याचा भारतीय जवानांनी खात्मा केला आहे. सज्जाद भट हा फेब्रुवारीमध्ये पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यामागील सुत्रधारांपैकी एक होता.
Getty Images
श्रीनगर : जैश-ए-मोहम्मद या संघटनेतील दहशतवादी सज्जाद भट याचा भारतीय जवानांनी खात्मा केला आहे. सज्जाद भट हा फेब्रुवारीमध्ये पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यामागील सुत्रधारांपैकी एक होता. अशी माहिती सुरक्षाबलाने दिली आहे. आज (मंगळवारी) सकाळी जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत त्याला ठार करण्यात आले आहे. या चकमकीत त्याच्या एका सहकाऱ्यालाही ठार करण्यात आले आहे. या चकमकीदरम्यान भारतीय सैन्यदलातील एक जवान शहीद झाला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सज्जाद हा सुरक्षाबलाच्या निशाण्यावर होता. पुलवामा हल्ल्याचे नियोजन करणाऱ्या 'जैश..'च्या मुख्य टोळीपैकी सज्जाद एक होता. आज झालेल्या चकमकीनंतर सुरक्षाबलाच्या जवानांनी सज्जाद लपून बसलेल्या ठिकाणावरुन मोठ्या प्रमाणआत शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला आहे. 14 फेब्रुवारी रोजी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामा परिसरात जैशच्या दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर आदळली होती. त्यामुळे झालेल्या स्फोटात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर 13 दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट परिसरातील जैशच्या अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. तसेच काही दिवसांपूर्वी काश्मीर परिसरात एका चकमकीत सज्जादच्या एका साथीदाराला कंठस्नान घातले होते.