नवी दिल्ली : उस्मानाबामधील तरुणाने दिल्लीत आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे. विकास बाजीराव बोदंर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
दिल्लीमध्ये मेट्रो पुढे उडी मारुन विकासने आत्महत्या केल्याचं समजतं आहे. विकास दिल्लीत राहून यूपीएससीची तयारी करत होता.
उस्मानाबाद जिल्ह्यातील देवधानोरा गावातील रहिवाशी असलेल्या विकासच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.