बिलासपूरहून मनाली आणि नंतर लेह पर्यंत जाणारा हा रेल्वेमार्ग सुमारे 500 किलोमीटर अंतराचा असेल. हा जगातील सर्वात उंच भागातून जाणारा रेल्वेमार्ग ठरणार आहे. यासाठी 50 हजार कोटींचा खर्च येण्याचा अंदाज आहे.
बिलासपूर-लेह रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षणासाठी 157 कोटी रुपयांचा निधी असून त्यापैकी 40 कोटी रुपये आधीच देण्यात आले आहेत. कुठल्याही ऋतूमध्ये लेह-लडाखपर्यंत अंतर कापता यावं, यासाठी संरक्षण मंत्रालय हा प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्याच्या तयारीत आहे.
दुसरीकडे, लेहला श्रीनगरशी जोडण्यासाठीच्या दुसऱ्या रेल्वेमार्गाचा पण विचार सुरु असल्याचं म्हटलं जातं. जोजिला-कारगिलमार्गे लेहपर्यंत रेल्वेमार्ग विस्तारण्याचा विचार आहे.