Opposition Meeting in Patna: बिहारची राजधानी पाटणामध्ये (Patana) शुक्रवारी 23 जून रोजी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी (Opposition Party meeting)आता नेते मंडळी पाटणामध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूब मुफ्ती या देखील शुक्रवारी होणाऱ्या बैठकीसाठी पाटणामध्ये पोहचले आहेत. दरम्यान आणखी बरेच विरोधी पक्षाचे नेते पाटणामध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील पाटणामध्ये पोहचल्या आहेत. तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील या बैठकीसाठी आज (2 जून) रोजी पाटणामध्ये दाखल होतील. या बैठकीमध्ये अनेक विरोधी पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पाटणामध्ये होणारी बैठक ही सकारात्मक होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, देशाला संकटातून वाचवण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला हरवावं लागणार आहे. 


बैठकीत 'हे' नेते होणार सहभागी


काँग्रेसचे नेते राहुल गांधी
काँग्रेस अध्यक्ष - मल्लिकार्जून खर्गे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
आपचे प्रमुख - अरविंद केजरीवाल
डीएमकेचे प्रमुख - एमके स्टॅलिन 
झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख - हेमंत सोरेन
समाजवादी पक्षाचे प्रमुख - अखिलेश यादव
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख - उद्धव ठाकरे 
पीडीपी प्रमुख - महबूब मुफ्ती 
नॅशनल  कॉन्फरन्स प्रमुख - उमर अब्दुल्ला 
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस - डी राजा
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस - सीताराम येचुरी 
भारत कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशनचे सरचिटणीस - दीपांकर भट्टाचार्य 


केजरीवाल बैठकीत अध्यादेशाचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता


'एबीपी न्यूज'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे या बैठकीत अध्यादेशाचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जर काँग्रेसने अध्यादेशाविरोधात केजरीवाल यांना समर्थन दिले नाही तर केजरीवाल या बैठकीत काढता पाय घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. 


ममता बॅनर्जींनी घेतली लालू प्रसाद यादवांची भेट 


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची देखील भेट घेतली. ममता बॅनर्जी या बैठकीसाठी पाटणामध्ये दाखल झाल्या असता त्यांनी लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. 






बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही विरोधी पक्षांची बैठक आयोजित केली आहे. अतिथिगृहामध्ये राज्यातील माजी आणि आजी मुख्यमंत्री हे थांबणार असून तिथेच विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Manipur: मणिपूरचा मुद्दा मोदींसाठी महत्त्वाचा नाही, PM देशाबाहेर असताना सर्वपक्षीय बैठक; राहुल गांधींची टीका