मसूद अझहरचा उजवा हात मुफ्ती यासिरला कंठस्नान
एबीपी माझा वेब टीम | 26 Apr 2018 01:29 PM (IST)
जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुफ्ती यासिर याला कंठस्नान घालण्यात आलं आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश मिळालं आहे. जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुफ्ती यासिर याला कंठस्नान घालण्यात आलं आहे. पोलीस महासंचालक एसपी वैद यांनी आपल्या ट्वीटरवरुन ही माहिती दिली आहे. 'त्रालमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती यासिरही मारला गेला.' यासिर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसहूद अझहर याचा उजवा हात मानला जायचा. एप्रिल रोजी त्रालच्या जंगलात दहशतवादी लपल्याचं माहिती राष्ट्रीय रायफल्स (आरआर), राज्य पोलीस आणि केंद्रीय रिजर्व पोलीस दल (सीआरपीएफ) सहित सुरक्षा दलांनी संयुक्तपणे ऑपरेशन सुरु केलं होतं. याच ऑपरेशनदरम्यान यासिरला ठार करण्यात आलं. यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवानही शहीद झाले.