Anna Hazare on Operation Sindoor : भारतीय लष्कराने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत. यानंतर भारतीय सैन्य दलाचं देशभरातून कौतुक केलं जात आहे. यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील ऑपरेशन सिंधूरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लष्कराच्या कारवाईचे कौतुक केले आहे. खरं तर भारतीय सैन्याने केलेल्या या कारवाईचे कौतुक करण्यासाठी शब्दही अपुरे आहेत, इतकं सुंदर काम लष्कराने केल्याचे अण्णा हजारेंनी म्हटलं आहे.
आता कुणाची भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत होणार नाही
भारत स्वतःहून कोणाची छेडखानी करत नाही, मात्र केलं तर सोडायचं नाही ही कारवाई योग्य असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. काही कारण नसताना आमचे 26 लोक मारले गेलेत. त्याचा बदला भारताने घेतला आहे. त्यामुळं कोणी काहीही बोलू शकत नाही. अशा प्रकारे कारवाई केल्याने आता कुणाची भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत होणार नाही, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.
9 दहशतवादी तळांवर हल्ला
पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) मृत्यूमुखी पडलेल्या 26 पर्यटकांच्या मृत्यूचा बदला भारतानं पाकिस्तानच्या घरात घुसून घेतला आहे. पाकिस्ताननं (Pakistan) आसरा दिलेल्या तब्बल 9 दहशतवादी तळांच्या भारतानं चिंध्या उडवल्या. भारतानं याला 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) असं नाव दिलंय. पहलगाममध्ये ज्यांचं कुंकू पाकच्या दहशतवाद्यांनी हिरावलं, त्या सर्व महिलांचा बदला आज भारतीय सैन्यानं घेतला. संपूर्ण देशभरात भारतीय सैन्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. पण, दुसरीकडे पाकिस्तान मात्र पुरतं भांबावलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतासोबत युद्धाची तयारी करणाऱ्या पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'नं जोरदार धक्का दिला आहे. फक्त 23 मिनिटांत भारतीय सैन्यानं पाकिस्तानचा माज उतरवला. नऊ प्रमुख दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे, ही ठिकाणे दहशतवादी कारवायांची केंद्रे मानली जात होती. संरक्षण मंत्रालयाने ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला अचूक आणि संयमी प्रतिसाद म्हणून वर्णन केले. या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचे दोन टॉप दहशतवादीही मारले गेले आहेत.
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 26 पर्यंटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 6 महाराष्ट्रातील नागरिकांना देखील समावेश होता. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात झाली होती. अखेर रात्री भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानमधील 9 दहशतवादी स्थळांवर हल्ले केले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचा मोठा निर्णय, देशातील 9 विमानतळं 10 मेपर्यंत राहणार बंद; श्रीनगरचं काय?