Operation Sindoor News: पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) फक्त आणि फक्त दोनच आठवड्यांत भारताना 26 पर्यटकांच्या मृत्यूचा बदला घेतला. पाकिस्तानच्या (Pakistan) घरात घुसून भारतीय सैन्यानं (Indian Military) दहशतवादी तळांच्या चिंधड्या उडवल्या. तब्बल 9 दहशतवादी तळं भारतानं उद्ध्वस्त केली, ज्यामध्ये बहावलपूरमध्ये (Bahawalpur) असलेलं लश्कर-ए-मोहम्मदच्या हेडक्वार्टरचा (Lashkar-e-Mohammed's Headquarters) समावेश आहे.
भारतीय सशस्त्र दलांनी मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (Pok) मधील 9 दहशतवादी तळांवरवर क्षेपणास्त्र हल्ला केला. यामध्ये लष्कर-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या बहावलपूरचा समावेश आहे. भारतीय सशस्त्र दलांनी ही कृती 'केंद्रीत, मोजमापित आणि काळजीपूर्वक' केली आहे, असंही संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे.
भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात हाहाकार माजला आहे. एअर स्ट्राईकनंतर आता सर्व सीमाभागांत अर्लट जारी करण्यात आला असून सुरक्षा दलांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. अशातच आता खबरदारीचा उपाय म्हणून, कारगिल युद्धाचा हिरो पुन्हा एकदा बॉर्डरवर तैनात करण्यात आला आहे. शुत्रूच्या चिंधड्या उडवण्यासाठी 'हॉवित्झर' (Howitzer) आता सीमेवर उभा ठाकला आहे. दरम्यान, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान एलओसीवर गोळीबार करत आहे. तर भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.
बोफर्सनं दाखवलेली ताकद
बोफोर्स तोफांनी कारगिल युद्धात आपल्या ताकदीनं शत्रूच्या चिंध्या चिंध्या केल्या होत्या. 'ऑपरेशन विजय'मध्ये पाकिस्तानला गुडघे टेकवण्यास भाग पाडलं होतं. कारगिल युद्धातील भारताच्या यशाचं श्रेय तोफांच्या प्रभावी वापराला देण्यात आलं होतं. बोफोर्स एफएच-77 बी हॉवित्झर, ही 155 मिमीची तोफ होती. तिची उल्लेखनीय अचूकता आणि रेंजमुळे हॉवित्झरनं महत्त्वाची भूमिका बजावलेली. ही तोफ शत्रूच्या बंकर्सना कमकुवत करण्यात आणि त्यांच्या सप्लाय लाईन्समध्ये व्यत्यय आणण्यात मदत करणारी होती. यामुळे ही तोफ कारगिल युद्धातील सर्वात मोठ्या शस्त्रांपैकी एक बनली.
दोन लाखांहून अधिक तोफगोळे, बॉम्ब डागले
कारगिल युद्धादरम्यान भारतीय तोफखान्यांनी 2,50,000 हून अधिक तोफगोळे, बॉम्ब आणि रॉकेट डागले. 300 तोफा, मोर्टार आणि एमबीआरएलमधून दररोज सुमारे 5,000 गोळे, मोर्टार बॉम्ब आणि रॉकेट डागले जात होते, तर टायगर हिल ताब्यात घेतल्याच्या दिवशी 9,000 गोळे डागले गेले. हल्ल्यांच्या काळात, सरासरी, प्रत्येक आर्टिलरी बॅटरीनं सलग 17 दिवस प्रति मिनिट एकापेक्षा जास्त राउंड फायर केले. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात इतक्या दीर्घ कालावधीत इतक्या तीव्र फायरिंगचं दर्शन कुठेही झालेलं नाही.
पाहा व्हिडीओ : पाकिस्तानला चीननं गिफ्ट दिलेल्या JF 17 चा भारतीय लष्कराकडून चक्काचूर
महत्त्वाच्या इतर बातम्या :