Who Is Masood Azhar: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आज (7 मे) पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करत चोख प्रत्युत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) या एअरस्ट्राइकमध्ये कुख्यात दहशतवादी मसूर अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा झाला. इतरही अनेक दहशतवादी या एअर स्ट्राइकमध्ये मारले गेले आहेत. यात मसुद अजहरचा भाऊ रऊफ अजगर हा गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  मुंबईत झालेल्या 26/ 11 च्या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहर (Masood Azhar) असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर मसूद अजहरचा अनेक मोठ्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता.  भारताच्या भूमीवर दहशतवादाने थैमान घडणारा मसूद अजहर नेमका कोण? कोणत्या दहशतवादी कारवायांमध्ये तो होता? पाहूया...


22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पिढी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर करण्यात आले. या कारवाईत नऊ दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष करून नष्ट करण्यात आले. निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची पूर्ण काळजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान घेण्यात आली होती. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या आणि प्रशिक्षणाच्या  ठिकाणांनाही ऑपरेशन सिंदूरमध्ये  लक्ष्य करण्यात आले. या लपण्यांच्या ठिकाणांपैकी काही दहशतवादी हे मसूद अजहरचे होते. जे भारतीय सैन्याने उध्वस्त केले आहेत. 


कोण आहे मसूद अजहर? 


मौलाना मसूद अजहर हा जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे .2019 मध्ये भारतातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती .पुलवामाच्या हल्ल्यात भारताचे 40 हून अधिक सैनिक शहीद झाले होते .पठाणकोटमधील दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा आरोपही मसूद अजहरवर होता . संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेला जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर आयएसआयने 2001 मध्ये संसदेवर केलेल्या हल्ल्याचा तसेच पुलवामा हत्याकांडासह भारतावर झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांचा मास्टरमाइंड आहे .


जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा संस्थापक मौलाना मसूद अझहर बहावलपूरमध्ये कडक सुरक्षा असलेल्या परिसरात उघडपणे राहत आहे. 2002 मध्ये जैश-ए-मोहम्मदला अधिकृतपणे बेकायदेशीर घोषित करण्यात आले असले तरी, ही बंदी कागदावरच आहे, कारण हा गट  दहशतवादाची प्रशिक्षण शिबिरे चालवतो.


1968 मध्ये बहावलपूर येथे जन्मलेला अझहर एकेकाळी अफगाणिस्तानातील हरकत-उल-मुजाहिदीन (HuM) चा सदस्य आणि धर्मगुरू होता. 1994 मध्ये दहशतवादाच्या आरोपाखाली भारतात अटक करण्यात आली होती, नंतर त्याला सोडण्यात आले आणि जानेवारी 2000 मध्ये कराचीमध्ये त्याने जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली. कट्टरपंथी देवबंदी विचारसरणीवर आधारित हा गट तेव्हापासून भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी आहे. ज्यात जम्मू-काश्मीर विधानसभा आणि भारतीय संसदेवरील हल्ले यांचा समावेश आहे.


2019 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या अझहरला मूत्रपिंडाच्या समस्या असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे  तो सार्वजनिकरित्या कुठेही उपस्थित राहू शकत नाही. जून 2024 मध्ये तो शेवटचा एका लग्नात दिसला होता. त्याचा भाऊ अब्दुल रौफ अझहर आणि वरिष्ठ कार्यकर्ते शाह नवाज खान आणि मौलाना मुफ्ती मोहम्मद असगर हे पाकिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये 300 हून अधिक दहशतवादी भरतीसह प्रशिक्षण शिबिरांचे निरीक्षण करतात असे वृत्त आहे. भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत मसूद अझहरच्या दहशतवादी अड्ड्यांवर क्षेपणास्त्र हल्ला केला असून यात बहावलपूरमधील त्याचा मदरसा आणि जैशचे मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. 


हेही वाचा:


Operation Sindoor: मोठी बातमी : मसूद अजहरचं आख्खं कुटुंब संपलं, भाऊ, बहिणीसह 14 जणांना यमसदनी धाडलं!