मुंबई: नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता 500 आणि 1000च्या नोटा बँकेत बदलून मिळणार नाहीत. तसेच 1000च्या नोटा इतर कुठेही चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला त्या थेट बँकेतच जमा कराव्या लागणार आहेत. 15 डिसेंबरपर्यंत 500च्या जुन्या नोटा मात्र काही महत्त्वाच्या ठिकाणी स्वीकारल्या जाणार आहेत.

15 डिसेंबर 2016पर्यंत फक्त इथे स्वीकारल्या जाणार 500च्या जुन्या नोट्या:

1. केंद्र सरकार आणि राज्य सरकारी शाळा, महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांच्या फीसाठी 500च्या जुन्या नोट्या स्वीकरल्या जातील. मात्र फक्त 2000पर्यंतच जुन्या नोटा स्वीकारल्या जातील.

2. उदा. जर एका शाळेतील फी 3000 रुपये असेल तर तुम्ही जुन्या 500च्या फक्त चारच नोटा देऊ शकता. उरलेले 1000 रुपये तुम्हाला इतर नोटांमध्ये द्यावे लागतील.

3. केंद्र आणि राज्य सरकारच्या महाविद्यालयातील फीसाठी 500ची नोट स्वीकारली जाईल.

4. ग्राहक सहकारी भांडारमध्ये 500च्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील. पण त्याची मर्यादा 5000 पर्यंत असणार आहे.

5. प्री-पेड मोबाइलच्या टॉप अपसाठी 500ची जुनी नोट वापरता येणार आहे.

6. 15 डिसेंबरपर्यंत पाणी बिल आणि वीज बिल यासाठी 500च्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील. ही सुविधा फक्त वैयक्तिक आणि घरमालकांसाठी लागू असणार आहे.

7. 2 डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील  आणि राज्यातील टोल बंद असणार आहेत. 3 डिसेंबरपासून 15 डिसेंबरपर्यंत टोल नाक्यावर जुनी 500 रुपयांची नोट स्वीकारली जाईल.

8. सरकारी रुग्णालयं

9. रेल्वे तिकीट

10. बेस्ट बस, एसटी, पीएमटी बस यांसारखी सार्वजनिक वाहनं

11. विमानतळावरील तिकीट

12. दूध केंद्र

13. स्मशानभूमी

14. पेट्रोल पंप

15. मेट्रो स्टेशन

16. मेडिकल (डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आवश्यक)

17. एलपीजी गॅस सिलेंडर

18. रेल्वे कॅन्टिन

19. पुरातत्व विभागाच्या वास्तू (उदा. ताजमहल, लालकिल्ला, अजिंठा लेणी)


20. सरकारी बियाणं केंद्र

संबंधित बातम्या:
बँकांमध्ये जुन्या 500, 1000 च्या नोटा बदलून मिळणार नाही