पुणे : प्रॉव्हिडेंट फंड अर्थात पीएफच्या बाबतीत ईपीएफओ एक महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्यांच्या पगारातून पगाराच्या 12 टक्के रक्कम पीएफमध्ये जमा होत होती. ती रक्कम आता 10 टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे.


ईपीएफओने हा निर्णय घेतल्यास कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त पगार शिल्लक राहणार आहे. यासाठी कर्मचारी भविष्य निधी संघटनेची पुण्यात बैठक होईल.

मात्र यामुळे सामाजिक सुरक्षा योजना धोक्यात येतील, या कारणास्तव  कामगार संघटनांचा या प्रस्तावाला विरोध आहे. त्यामुळे या प्रस्तावाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.