जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीपच्या रामपूर सेक्टरमधून घुसखोरी करणाऱ्या तब्बल 8 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. रामपूरमध्ये 6 तर त्रालमध्ये 2 अतिरेक्यांना मारण्यात आलं. इतकंच नाही, तर हीजबुलचा टॉप कमांडर सबजार अहमदचाही खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे.




कोण होता सबजार अहमद?
- सबजार अहमद हा दहशतवादी बुरहान वानीचा उत्तराधिकारी होता.

- सबजार हा दक्षिण काश्मीरमध्ये बराच सक्रीय होता.

- ज्या घरात सबजारला घेरण्यात आलं होतं. ते घर त्याच्या काकांचं होतं अशी माहिती सुत्रांकडून समजते आहे.

- बुरहान वानीचा भाऊ खालिद हा ठार झाल्यानंतर म्हणजे 2015 साली सबजार हिजबुलमध्ये गेला होता.

- सबजार हा त्रालमध्ये बुरहानसाठी थेट ग्राऊंड वर्क करणारा मानला जात होता.

- अशीही माहिती आहे की, सबजार आणि बुरहान वानी हे बालपणीचे मित्र होते.

आज (शनिवार) सकाळी लष्कराच्या जवानांना रामपूर सेक्टरजवळ काही संशयास्पद हलचाली दिसून आल्या. त्यानंतर तात्काळ सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं. काही दहशतवादी सीमेजवळील तारा कापून आत घुसले होते. ज्यानंतर गोळीबारात लष्कराच्या जवानांनी त्यांना कंठस्नान घातलं.


काल (शुक्रवार) दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या पेट्रोलिंग करणाऱ्या टीमवर हल्ला केला होता. सुदैवानं यातील सर्व जवान सुखरुप बचावले.

लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सचे जवान सर्च ऑपरेशन करत होते त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अखेर आज सकाळी यातील चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं.

संबंधित बातम्या :

भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक पार्ट-2'चं कृष्णा खोऱ्याशी कनेक्शन?

सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताची मोठी कारवाई

जीपवर काश्मिरी तरुणाला बांधणाऱ्या मेजर गोगोईंचा सत्कार

LoC वर सुरुंग स्फोट, एक जवान जखमी

भारतीय लष्कराच्या ताफ्यात नव्या M-777 तोफा दाखल