मथुरा रेल्वे स्टेशनवर सोनू नामक प्रवाशाचा खिसा कापला. त्याचवेळी त्याच्या पत्नीला दुसऱ्या प्रवाशाचा धक्का लागला आणि तिच्या कडेवरील चिमुरडी हातातून निसटून प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि रुळांच्या मध्ये पडली. तिला उचलण्याच्या आतच भरधाव ट्रेन रुळावरुन धडधडत गेली.
ही घटना पाहून प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांच्या काळजात धस्स झालं. ट्रेन निघून जाताच प्रवाशांनी तिच्या दिशेने धाव घेतली. सुदैवाची गोष्ट म्हणजे चिमुरडीला साधं खरचटलंही नव्हतं. साहिबा असं या एक वर्षांच्या मुलीचं नाव आहे.
आपली चिमुकली सुखरुप असल्याचं पाहून आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने लेकीला उचलून घेतलं. ही सर्व घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पाहा व्हिडिओ: