अलाहाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1000 आणि 500 च्या नोटा रद्दच्या केल्याचे जाहीर केल्यानंतर काळं धन जमवणारे चांगलेच बिथरले आहेत. आतापर्यंत केवळ कचऱ्यात नोटा फेकल्याचं पुढे येत होतं. मात्र, आता लोक गंगा नदीतही नोटा फेकू लागल्याचं समोर येत आहे.


मिर्जापूरमधल्या गंगा नदीच्या किनाऱ्यावर हजार-हजाराच्या नोटा तरंगत असल्याचं दिसून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. हे पाहण्यासाठी स्थानिकांनी गंगा नदीच्या काढावर मोठी गर्दी केली होते. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस घटना स्थळी दाखल झाले. पण या नोटा फाडलेल्या अवस्थेत असल्याने त्यांनी त्या तशाच सोडून दिल्या.

दरम्यान या पूर्वीही उत्तरप्रदेशच्या बरेलीमधून 500 आणि 1000च्या नोटा अर्धवट जळालेल्या मिळाल्या होत्या. तर दुसरीकडे कालच पुण्यातही 1000च्या नोटा कचराकुंडीत आढळल्या होत्या.