Monkeypox Suspected Dies in Kerala : केरळमध्ये मंकीपॉक्स सदृश्य लक्षणं असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. संयुक्त अरब अमिरातीहून (UAE) केरळमध्ये परतलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णामध्ये मंकीपॉक्स विषाणू सदृश्य लक्षणं आढळली होती. केरळच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज (Kerala Health Minister Veena George) यांनी रविवारी माहिती दिली की, युएईहून परतलेल्या 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णामध्ये मंकीपॉक्स विषाणू सदृश्य लक्षणे आढळली होती. या रुग्णाचा मृत्यू मंकीपॉक्समुळे झाल्याचा संशय आहे. या रुग्णाला इतर कोणताही आजार नव्हता. रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोग्य विभाग तरुणाच्या मृत्यूचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे.


वीना जॉर्ज यांनी सांगितलं आहे की, 'हा तरुण 21 जुलै रोजी यूएईहून परतला होता, पण त्याला रुग्णालयात दाखल करण्यात उशीर का झाला, याची चौकशी करण्यात येईल. आरोग्य मंत्र्यांनी पुढे सांगितलं की, मंकीपॉक्स हा संसर्गजन्य रोग आहे, मात्र याचा संसर्ग कोरोनाप्रमाणे अधिक स्तरावर होत नाही. कोरोनाच्या तुलनेनं मंकीपॉक्समुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. दरम्यान 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला याचा अधिक तपास सुरु आहे.'


मंकीपॉक्स आजार पसरत असल्याने याचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. या आजाराबाबत अधिक माहिती उपलब्ध होण्यासाठी केरळमध्ये यावर संशोधन सुरु आहे. केरळमध्ये शनिवारी 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, या रुग्णामध्ये मंकीपॉक्स विषाणूसारखी लक्षणं होती. शनिवारी सकाळी त्रिशूरमधील एका खाजगी रुग्णालयात या रुग्णाचा मृत्यू झाला.


महत्त्वाच्या इतर बातम्या