Monkeypox Cases in India : जगभरात मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावानं चिंता वाढवली आहे. जगभरात 70 पेक्षा जास्त देशांमध्ये मंकीपॉक्सचे 15 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. भारतामध्येही मंकीपॉक्सने शिरकाव केलाय. आधीच कोरोना महामारीसोबत लढा सुरु असताना या नव्या संकटामुळे चिंतेत भर पडली आहे. अशातच आता महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील मंकीपॉक्सचे दहा संशयित निगेटिव्ह आले आहेत. 


गुरुवारी राज्यात मंकीपॉक्सचे आठ संशयित निगेटिव्ह आले आहेत. तर आज उर्वरित दोन जणांचा अहवालही निगेटिव्ह आला. राज्यातील दहा संशयित रुग्णांचे नमुणे तपासण्यासाठी एन आय व्ही. पुणे यांना पाठविण्यात आले होते. हे सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत. 


एन आय व्ही पुण्यासह आता मंकीपॉक्स निदानाची सोय आता राज्यातील आणखी दोन प्रयोगशाळा मध्ये झाली आहे. यामध्ये कस्तुरबा रुग्णालय मध्यवर्ती प्रयोगशाळा, मुंबई आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ( एम्स) नागपूर यांचा समावेश झाला आहे. राज्यात आता तीन ठिकाणी मंकीपॉक्सचं निदान होणार आहे. 


देशातील मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या पाच 
भारतात आतापर्यंत पाच रुग्णांना मंकीपॉक्स विषाणूची लागण झाली आहे. दिल्लीत नव्याने आढळेल्या रुग्णाआधी भारतात चार रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी आढळलेले मंकीपॉक्सचे तीनही रुग्ण केरळमधील आहेत. या बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. 


मंकीपॉक्सची लक्षणे काय?
सामान्यत: ताप, डोकेदुखी, तीन आठवड्यांपर्यंत पुरळ, घसा खवखवणे, खोकला आणि फोड ही मंकीपॉक्सची लक्षणे आहेत.   फोड साधारणपणे ताप आल्‍यानंतर एक ते तीन दिवसांच्‍या आत सुरू होतात, सुमारे दोन ते चार आठवडे टिकतात आणि उपचार सुरू राहेपर्यंत अनेकदा वेदनादायक असतात. त्यांना खाजही येते. मंकीपॉक्स विषाणूचा तळवे आणि तळवे यांच्यावर विशेष प्रभाव पडतो.


 मंकीपॉक्सचे सर्वाधिक रुग्ण समलिंगी संबंध ठेवणारे
 समलैंगिक संबंध असणाऱ्या आणि एकापेक्षा अधिक व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना मंकीपॉक्सचा धोका अधिक आहे. मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव टाळण्याकरता एकापेक्षा अधिक व्यक्तींसोबतचे लैंगिक संबंध टाळा, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.  अलीकडेच, WHO ने मंकीपॉक्स महामारीला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणूनही घोषित केलं आहे. आता WHO ने  लैंगिक साथीदारांची संख्या मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. डब्ल्यूएचओने सल्ला दिला आहे की, 'ज्या पुरुषांना मंकीपॉक्सचा धोका आहे, त्यांनी काही काळासाठी लैंगिक साथीदारांची संख्या मर्यादित करण्याचा विचार करावा. ' 78 देशांमध्ये मंकीपॉक्सची 18 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी सुमारे 70 टक्के प्रकरणे युरोपमधील आहेत. बहुतेक संक्रमण समलैंगिक पुरुषांमध्ये झाले आहे. भारतात सध्या मंकीपॉक्सचे चार रुग्ण आहेत आहेत. यांपैकी तीन केरळमधील असून एक रुग्ण दिल्लीतील आहे. मंकीपॉक्स प्रादुर्भाव रोखण्याकरता जनजागृतीसोबतच यंत्रणांनाही अलर्ट मोडवर राहाणं गरजे आहे.