मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा(tukdoji maharaj) जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी 30 एप्रिल 1909 रोजी झाला.  1925 मध्ये त्यांनी ‘आनंदामृत’ ग्रंथाची रचना केली. ते स्व:त भजन, कीर्तन, प्रवचन करत असत. त्यांनी खंजेरी वर उत्तम भजने गायली. 1995 च्या आसपास त्यांचा गांधीजींशी सहवास झाला. 28 ऑगष्ट 1942 पासून त्यांना स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतल्याने अटक झाली. त्यानंतर डिसेम्बरमध्ये त्यांची सुटका झाली.  5  एप्रिल 1943 रोजी त्यांनी श्री गुरुदेव मुद्र्नाल्याची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. 19 नोहेंबर 1943 रोजी त्यांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. 11 ऑक्टोबर 1968 रोजी त्यांचे निधन झाले. आजच्याच दिवशी म्हणजे  11 ऑक्टोबर 1942 रोजी  अमिताभ बच्चन यांचा जन्म अलाहाबाद येथे हिंदी कवी हरिवंशराय बच्चन आणि त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या तेजी बच्चन यांच्या घरी झाला. 


2008 : काश्मीर खोऱ्यात पहिली ट्रेन धावली 
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काश्मीर खोऱ्यात धावणाऱ्या पहिल्या ट्रेनला नौगाव स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला.


2002 : लोकेंद्र बहादूर नेपाळच्या पंतप्रधानपदी 
 नेपाळचे राजा ज्ञानेंद्र यांनी लोकेंद्र बहादूर यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली.


2001 : पोलरॉईड कार्पोरेशन दिवाळखोरी जाहीर केली
पोलरॉइड ही एक अमेरिकन कंपनी आहे. कंपनी  फिल्म आणि कॅमेर्‍यांसाठी प्रसिद्ध आहे. कंपनीची स्थापना 1937 मध्ये एडविन एच. लँड यांनी केली होती.  2001 मध्ये जेव्हा मूळ पोलरॉइड कॉर्पोरेशन दिवाळखोर घोषित करण्यात आले तेव्हा त्याचा ब्रँड आणि मालमत्ता विकल्या गेल्या. त्यामुळे नवीन पोलरॉइड तयार झाले. 


2000: STS-92 नासाचे शंभरावे स्पेस शटल मिशन प्रक्षेपित केले


STS-92 ही स्पेस शटल डिस्कव्हरी द्वारे उड्डाण केलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (ISS) स्पेस शटल मिशन होते. STS-92 हे स्पेस शटलचे 100 वे मिशन आहे. हे केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा येथून 11 ऑक्टोबर 2000 रोजी प्रक्षेपित करण्यात आले. 


1987 : ऑपरेशन पवन - श्रीलंकेत भारतीय सैन्याने ऑपरेशन पवन सुरू केले
ऑपरेशन पवन हे इंडियन पीस किपिंग फोर्स (IPKF) द्वारे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) कडून जाफना नियंत्रित करण्यासाठी केलेल्या ऑपरेशनचे कोड नाव होते. एलटीटीईच्या नि:शस्त्रीकरणासाठी भारत-श्रीलंका कराराचा एक भाग म्हणून 1987 च्या उत्तरार्धात ऑपरेशनची अंमलबजावणी करण्यात आली. काही आठवड्यांच्या क्रूर लढाईत, IPKF ने LTTE कडून जाफना द्वीपकल्पाचा ताबा घेतला.  भारतीय सैन्याचे रणगाडे, हेलिकॉप्टरच्या पाठिंब्याने  IPKF ने  LTTE पार केले. 11 ऑक्टोबर 1987 हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी भारतीय लष्कराने ऑपरेशन पवन सुरू केले होते.  भारतीय लष्कराने 1987 मध्ये श्रीलंकेत हे ऑपरेशन केले होते. 


1984 : कॅथरीन डी. सुलिव्हन  या स्पेस वॉक करणाऱ्या पहिल्या महिला अमेरिकन अंतराळवीर बनल्या
कॅथरीन डी. सुलिव्हन  या स्पेस वॉक करणाऱ्या पहिल्या महिला अमेरिकन अंतराळवीर बनल्या. अंतराळ शटलच्या एअरलॉकमधून बाहेर पडून अंतराळातून मुक्तपणे तरंगणारी पहिली अमेरिकन महिला बनल्या. हबल स्पेस टेलिस्कोपच्या नियोजन आणि प्रक्षेपणातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.


1968 : अपोलो 7 - नासाने पहिली यशस्वी मानवयुक्त अपोलो मोहीम प्रक्षेपित केली
नासाने 11 ऑक्टोबर 1968 रोजी आपली पहिली यशस्वी मानवयुक्त अपोलो मोहीम प्रक्षेपित केली. या मोहिमेला अपोलो 7 असे नाव देण्यात आले होते. 


1968 :  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा(tukdoji maharaj) जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी 30 एप्रिल 1909 रोजी झाला.  1925 मध्ये त्यांनी ‘आनंदामृत’ ग्रंथाची रचना केली. ते स्व:त भजन, कीर्तन, प्रवचन करत असत. त्यांनी खंजेरी वर उत्तम भजने गायली. 1995 च्या आसपास त्यांचा गांधीजींशी सहवास झाला. 28 ऑगष्ट 1942 पासून त्यांना स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतल्याने अटक झाली. त्यानंतर डिसेम्बरमध्ये त्यांची सुटका झाली.  5  एप्रिल 1943 रोजी त्यांनी श्री गुरुदेव मुद्र्नाल्याची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. 19 नोहेंबर 1943 रोजी त्यांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. 11 ऑक्टोबर 1968 रोजी त्यांचे निधन झाले. 


1958 : पायोनियर 1 - नासाने पहिले अंतराळ संशोधन प्रक्षेतीत केले
पायोनियर 1  हे एक अमेरिकन स्पेस प्रोब होते, जे NASA च्या अंतर्गत होते. 11 ऑक्टोबर 1958 रोजी नासाने एबल रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले.  परंतु मार्गदर्शनातील त्रुटीमुळे चंद्राची कक्षा गाठण्यात ते अयशस्वी झाले आणि पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केल्यावर ते नष्ट झाले. 43 तास चाललेले आणि 113,800 किमी (70,700 मैल) अंतरापर्यंत पोहोचलेले हे उड्डाण तीन स्पेस प्रोबपैकी दुसरे आणि सर्वात यशस्वी ठरले.


1942  : अभिनेते  अमिताभ बच्चन यांचा जन्म 
अमिताभ बच्चन यांचा जन्म  11 ऑक्टोबर 1942 रोजी  अलाहाबाद येथे हिंदी कवी हरिवंशराय बच्चन आणि त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या तेजी बच्चन यांच्या घरी झाला. झाला. भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. 1970-80 च्या दरम्यान  ते भारतीय चित्रपटातील सर्वात प्रभावी अभिनेत्यांमध्ये त्यांना ओळखले जाते.   त्यांचे शिक्षण नैनिताल  आणि दिल्ली विद्यापीठातील किरोरी माल महाविद्यालयात झाले. 1969 मध्ये भुवन शोम या चित्रपटात  निवेदक म्हणून त्यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली. त्यांनी 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला जंजीर, दीवार आणि शोले यांसारख्या चित्रपटांसाठी लोकप्रियता मिळवली. हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी त्यांना भारताचा "अँग्री यंग मॅन" म्हणून संबोधले गेले.


अमिताभ यांना बॉलीवूडचा शहेनशाह (त्यांच्या 1988 मधील शहेनशाह चित्रपटाच्या संदर्भात), महानायक, स्टार ऑफ द मिलेनियम, किंवा बिग बी म्हणून संबोधले जाते.  त्यांनी जवळपास 200 हून अधिक चित्रपटात काम केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार मिळाले. यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांना 16 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.  


1946 : परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅकचे निर्माते आणि संस्थापक विजय भटकर यांचा जन्म 


विजय भटकर  हे भारतीय संगणक शास्त्रज्ञ आहेत. परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅकचे निर्माते आणि संस्थापक म्हणून भटकर यांना ओळखले जाते. भटकर यांचे मूळ गाव  अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा हे अडीचशे-तीनशे लोकवस्तीचे गाव.  भटकर यांचे शालेय शिक्षण मूर्तिजापूर येथे झाले. त्यांनी विश्वेश्वरय्या रीजनल इंजिनीअरिंग कॉलेज, नागपूर येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. वडोदरा येथील विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आयआयटी, दिल्ली येथून पी.एचडी. प्राप्त केली. विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना 1968 साली झाली. त्या कमिशनवर भटकरांनी दहा वर्षे काम केले. ते इंदिरा गांधींनी 'इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार' साठी 1972 साली नेमलेल्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठ्या प्रयोगशाळेची स्थापना केली. ते या संस्थेचे संचालक होते. भटकरांच्या मार्गदर्शनाखाली केरळमध्ये अठरा कारखाने उभारले गेले.
 
1634 : बर्चर्डीचा पूर - या पुरामुळे नॉर्थ फ्रिसलँड, डेन्मार्क आणि जर्मनीमध्ये  15 हजार लोकांचा मृत्यू 


11-12 ऑक्टोबर 1634 च्या रात्री  जर्मनी आणि डेन्मार्कमध्ये पूर आला होता. किनाऱ्यालगत अनेक ठिकाणी या रात्री उत्तर समुद्रधरणे तुटली, उत्तर फ्रिशियाच्या किनारपट्टीवरील शहरे आणि समुदायांमध्ये पाण्याचा पूर आला. या पुरात जवळपास 15 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.