Omicron Cases LIVE: देशावर ओमायक्रॉनचं संकट; जगभरातील प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर

Omicron Cases LIVE Updates: दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंट ओमायक्रॉननं संपूर्ण जगाला चिंतेत टाकलंय.

abp majha web team Last Updated: 05 Dec 2021 01:31 PM
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

ओमायक्रॉनशी दोन हात करण्यासाठी मुंबई कितपत सज्ज?

Omicron Variant in Mumbai : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं देशासह राज्याचीही चिंता वाढवली आहे. सध्या राज्यात 8 ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रशासन सज्ज झालं असून तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना ओमायक्रॉनचं संकट (Omicron Variant) आपण रोखू असंही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसेच मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी (Suresh Kakani) यांनी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 15 डिसेंबर आधी पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल. शेवटच्या 4-5 दिवसांत पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं आहे. 


महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "आजही कोरोना संपलेला नाही. त्यात आता ओमायक्रॉन आला आहे. मुंबईत ओमायक्रोनचा रुग्ण अजूनही आढळलेला नाही. मुंबई सर्वांच्यात आहे, इकडे अनेकजण कामाला येत असतात. त्यामुळे तो प्रादुर्भाव वाढू नये याची काळजी घेत आहोत. आपण लसीकरण मोठ्या प्रमाणात करत आहोत. सर्व नियम येत असतात. नियमांचे पालनही मुंबईकर करत आहेत. हे संकट आपण रोखू. आताच्या घडीला मिळालेला रुग्ण सौम्य लक्षणं असलेला आहे." 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

आतापर्यंत देशात 4 लाख 73 हजार 537 मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 98 हजार 416 आहे. तसेच या महामारीत जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 73 हजार 537 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (रविवारी) 8834 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 3 कोटी 40 लाख 69 हजार 608 वर पोहोचली आहे. 

देशात गेल्या 24 तासांत 8 हजारांहून अधिक कोरोनाबाधित

Coronavirus Cases Today in India : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस (Coronavirus) चा प्रादुर्भाव सुरुच आहे. अशातच जगाची धास्ती वाढवणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा भारतातही शिरकाव झाला आहे. सध्या देशात ओमायक्रॉनचे 21 रुग्ण आहेत. अशातच देशात काल (रविवार) दिवसभरात 8 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या सध्याची कोरोनाची स्थिती... 


आतापर्यंत 4 लाख 73 हजार 537 मृत्यू 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 98 हजार 416 आहे. तसेच या महामारीत जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 73 हजार 537 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (रविवारी) 8834 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 3 कोटी 40 लाख 69 हजार 608 वर पोहोचली आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

ओमायक्रॉन इतर व्हेरियंटपेक्षा धोकादायक नाही, सिंगापूर आरोग्य मंत्रालयाची माहिती

जगभरात ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटव्हेरियंटव्हेरियंट चिंतेचा विषय बनला असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट कोरोनाच्या (Corona) इतर व्हेरियंटपेक्षा धोकादायक असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नसल्याची माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं (Singapore Health Ministry) दिली आहे. याबाबत अधिक निष्कर्षासाठी आणि व्हेरियंटची संरचना जाणून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे. ओमायक्रॉन इतर व्हेरियंटपेक्षा धोकादायक असण्याचे किंवा या व्हेरियंटवर सध्याची कोविड लस प्रभावी नसल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, अशी माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 'चॅनल न्यूज एशिया' वृत्तपत्राच्या माहितीनुसार, मंत्रालयानं सांगितलं की, ओमायक्रॉनबद्दल अधिक माहिती आणि अभ्यास आवश्यक आहे. येत्या आठवड्यात जागतिक स्तरावर आणखी माहिती समोर येईल.

महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णाची संख्या 8 वर

शनिवारी डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला होता. यामध्ये आता पुण्यातील 7 रुग्णांची भर पडली आहे. रविवारी पिंपरी चिंचवडमधील 6 तर पुण्यात एका रुग्णाची भर पडली आहे. पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्य दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलींनाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सहा रुग्णापैकी तीन जण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

5 राज्य, 21 रुग्ण; लसवंतांनाही संसर्ग, देशात वाढतोय ओमायक्रॉन

Omicron Variant in India : जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं धाकधुक वाढवली आहे. अशातच आता या व्हेरियंटनं भारतातही प्रवेश केला आहे. जगभरातील एकूण 38 देशांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाल्याची माहिती मिळत आहे. भारतातही आता ओमायक्रॉन आपले हातपाय पसरताना दिसत आहे. केवळ चारच दिवसात भारतात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे. 2 डिसेंबर रोजी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तर 6 डिसेंबरपर्यंत या व्हेरियंटची संख्या 21 वर पोहोचली आहे. 


रविवारी एका दिवसात ओमायक्रॉनचे नवे 17 रुग्ण देशात आढळून आले. राजस्थानच्या जयपूरमध्ये 9, महाराष्ट्रात 7 आणि राजधानी दिल्लीमध्ये 1 या रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंट राजधानी दिल्लीसह 5 राज्यात फैलावला आहे. अशातच देशातील एकूण ओमायक्रॉनची संख्या 21 वर पोहोचली आहे. सर्वाधिक 9 रुग्ण राजस्थानमध्ये आहे, तर 8 रुग्ण महाराष्ट्रात, 2 रुग्ण कर्नाटकात, तर दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 1-1 रुग्ण आहे.  


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

जयपूरमधील एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमायक्रॉनची लागण

Omicron Variant Cases in India : महाराष्ट्रानंतर जयपूरमध्येही कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा स्फोट उडालाय. महाराष्ट्रात रविवारी सात रुग्णाची भर पडली होती.  जयपूरमध्येही एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. यामधील चार जण दक्षिण आफ्रिकेतून परतले होते. त्यांच्या संपर्कातील अन्य पाच जणांना संसर्ग झालाय. सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळली आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. देशातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या 21 वर पोहचली आहे.

ओमायक्रॉनला घाबरु नये, पण नियमांचं पालन करणं गरजेच

 


इतर देशातून येणारे प्रवाशांकडे आता राज्य सरकारचं लक्ष आहे. सगळ्यांना तपासलं जात आहे. मागील महिन्याभरात इतर देशातून भारतात आलेले प्रवाशांचा देखील राज्य सरकार डेटा गोळा करत आहे. ओमायक्रॉन हा विषाणू नक्कीच वेगाने पसरतो.   या विषाणू बद्दल आता लगेच काही सांगणं कठीण आहे.. फक्त सर्वेक्षण सर्वेक्षण हाच पर्याय सध्या राज्य सरकारसमोर आहे..दुसरी लाट ओसरत असताना लोकांनी या नवीन  विषाणूला लक्षात घेतात कोरोना नियमांचं पालन करणं गरजेच  आहे. घाबरण्य़ाची गरज नाही - डॉक्टर प्रदीप आवटे राज्य सर्वेक्षण अधिकारी.. 

पार्श्वभूमी

Omicron: जगावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावू लागलंय. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंट ओमायक्रॉननं (Omicron) संपूर्ण जगाला चिंतेत टाकलंय. दक्षिण आफ्रिकेसह 12 देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळू आले आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी प्रवासाच्या नियमावलीत बदल केलाय. मात्र, तरीही देशात ओमायक्रॉन रुग्ण आढळून येत आहेत. 


कोरोनाची रुग्ण संख्येत घट होत असताना देशासमोर ओमायक्रॉनच्या रुपात नवं संकट उभं राहिलंय. देशात ओमायक्रॉनचे पहिले दोन रुग्ण कर्नाटकमध्ये आढळून आले. त्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा एक-एक रुग्ण आढळून आलाय. आता दिल्लीत देखील ओमायक्रॉननं शिरकाव केलाय. टांझानियातून परतलेल्या व्यक्तीची ओमायक्रॉन चाचणी सकारात्मक आलीय. यामुळं सध्या देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या पाचवर पोहचलीय. देशातील ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्यानं नागरिक धास्तावून गेले आहेत. 


कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन सध्याच्या औषधांना, लसीला दाद देतोय किंवा नाही, याबाबत डॉक्टर आणि तज्ञ जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, नागरिकांनी घाबरून अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण, ओमायक्रॉन संसर्गाचा वेग पूर्वीच्या डेल्टापेक्षा कितीतरी जास्त आहे. याचबरोबर नागरिकांनी कोरोना निर्बंधांचं पालन करणं आवश्यक आहे. 


देशात चार ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळलेल्यामुळं चिंतेचे वातावरण आहे. बंगळुरुमध्ये दोन तर गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याने देशभरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच देशासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात शनिवारी एका दिवसात एक कोटी लसीचे डोस जनतेला देण्याची विक्रमी कामगिरी केलीय. आरोग्य मंत्रालयाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.