EC Meeting on Election Rallies: देशात एका बाजूला ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. या सभांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळत असून कोव्हिड प्रोटोकॉलचे उल्लंघन होत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून अधिकाधिक गर्दीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवदेखील सहभागी होणार आहे. ओमायक्रॉनचा धोका, विषाणूचे स्वरुप आदींबाबत आरोग्य विभाग निवडणूक आयोगाला माहिती देणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाला आरोग्य सचिवांकडून ओमिक्रॉनचा वाढता धोका आणि त्याच्याशी संबंधित सर्व माहिती जाणून घ्यायची आहे. ओमायक्रॉन किती धोकादायक आहे आणि ते टाळण्यासाठी काही उपाय काय आहेत हे आरोग्य मंत्रालयाकडून जाणून घ्यायचे आहे.
देशातील मोठ्या प्रमाणावरील प्रौढ लोकसंख्येला कोरोनाचा पहिला आणि दुसरा डोस मिळाला असेल, तर या ओमिक्रॉनचा धोका किती वाढला आहे. अशा वातावरणात निवडणुका घेतल्या तर कोरोनाचा हा नवा प्रकार पसरण्यापासून कसा रोखता येईल, हे जाणून घेण्याचाही केंद्रीय निवडणूक आयोग प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायलयाने ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता, केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला प्रचारसभा, रोड शोवर निर्बंध लावण्याबाबत आणि शक्य असल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा विचार करावा असे निर्देश दिले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Salman Khan : एकदा नव्हे तर तीनदा सापाने दंश केला; सलमान खानने सांगितली घटना
- संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha