Sri Lanka Arrested Indian Fishermen : श्रीलंकेच्या नौदलाने (Sri Lankan navy) जाफना (Jaffna) मधील डेल्फ्ट बेटाच्या आग्नेय समुद्रात 43 भारतीय मच्छिमारांना (Indian Fisherman) अटक करण्यात आली आहे. यासह श्रीलंकेच्या नौदलाने सहा भारतीय बोटी ताब्यात घेतल्या आहेत. रविवारी या संदर्भात अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. श्रीलंकेच्या आग्नेय समुद्री भागात 19 डिसेंबरला ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
श्रीलंकेच्या ताब्यात 43 भारतीय मच्छिमार
श्रीलंकेच्या नौदलाने शनिवारी या मच्छिमारांना जाफना येथील डेल्फ्ट बेटाच्या आग्नेय समुद्रात अटक केली. श्रीलंकेच्या नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, 18 डिसेंबर 2021 रोजी रात्री श्रीलंकन नौदलाने जाफना येथील डेल्फ्ट बेटाच्या दक्षिण-पूर्व समुद्रात केलेल्या एका विशेष मोहिमेत श्रीलंकेच्या समुद्रातील मासे पकडणाऱ्या सहा भारतीय नौकांसह 43 भारतीय मच्छिमारांना पकडण्यात आले आहे.
उत्तरेकडील नौदल कमांडशी संलग्न फास्ट अटॅक क्राफ्ट फ्लोटिला (4 FAF)कडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की मोहिमेदरम्यान कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले गेले. पकडलेल्या भारतीय मच्छिमारांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली, त्यानंतर कायदेशीर कारवाईसाठी त्यांना संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
भारत आणि श्रीलंका दोन्ही देशांतील मच्छीमारांना अनेकदा नकळत एकमेकांच्या समुद्री भागात घुसल्याबद्दल अटक केली जाते. द्विपक्षीय संबंधांमध्ये मच्छिमारांचा मुद्दा मोठा चिघळला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- रावसाहेब दानवे यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका, म्हणाले...
- बुलढाण्यात 'डॉली की डोली'! व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लग्न इंदौरच्या तरुणाला महागात, परिवाराला लुटलं
- Winter Skin Care : हिवाळ्यात तजेलदार त्वचा हवीय? करा 'या' नैसर्गिक तेलांचा वापर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha