भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दोन दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसने नुकतेच पक्षाच्या सरचिटणीसपदी माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी यांची नियुक्ती केली. त्यावर भाजपने टीका सुरु केली आहे. त्यावरुन टीका करताना अमित शाह म्हणाले काँग्रेस हा पक्ष म्हणजे ओआरओपी (ओन्ली राहुल ओन्ली प्रियांका) आहे. त्याला आज ओमर अब्दुल्ला यांनी प्रत्युत्तर दिले.
हिमाचल प्रदेशमधील सभेत बोलताना अमित शाह म्हणाले होते की, मोदी सरकारने 'वन रँक वन पेन्शन'च्या (ओआरओपी) माध्यमांतून माजीसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचं भविष्य सुरक्षित केलं. मात्र, काँग्रेसने ‘ओन्ली राहुल, ओन्ली प्रियंका’(ओआरओपी)द्वारे केवळ राहुल प्रियांका या दोघांचेच भविष्य सुरक्षित केले.