मुंबई: रेल्वे तिकिट, बसचं तिकिट, आणि मेट्रोच्या तिकिट काऊंटरवर आजपासून जुनी पाचशेची नोट चालणार नाही. नोटबंदीच्या निर्णयानंतर प्रवास करणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारनं 10 डिसेंबरपर्यंत तिकिट काऊंटरवर जुनी 500 ची नोट स्वीकारावी असे आदेश दिले होते.


आता लोकांच्या हातात नवीन चलन पडलं आहे. त्यामुळे आजपासून रेल्वे, बस आणि मेट्रोच्या तिकिटाला नवी पाचशेची नोटच वापरता येईल.

दरम्यान, आजपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. दुसरा शनिवार, रविवार आणि ईद या सुट्ट्या सलग आल्यामुळं बँकांचं शटर तीन दिवस डाऊन असणार आहे. त्यामुळं रक्कम काढण्यासाठी काल बँका आणि एटीएम बाहेर मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या.

नोटबंदीच्या घोषणेला महिना उलटला तरी सुट्ट्या पैशांची चणचण कायम आहे. त्यामुळं आजपासून पुढचे तीन दिवस बँका बंद असल्यामुळं खिशातली कॅशही जपून वापरावी लागणार आहे.