भाजपला गोव्यात 5 जागा मिळाल्या, तरी त्यांनी काम केलंय असं म्हणेन : वेलिंगकर
एबीपी माझा वेब टीम | 09 Dec 2016 09:37 PM (IST)
पणजी (गोवा) : गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला किमान 5 जागा मिळाल्या, तीर गेली पाच वर्षे त्यांची चांगला कारभार केला, असं म्हणता येईल, असा टोला सुभाष वेलिंगकर यांनी लगावला आहे. तर दुसरीकडे भाजपाल गोव्यात वेलिंगकरांपाठोपाठ आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे प्रमुख दीपक ढवळीकर यांनी संकेत दिले आहेत की, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत महाराष्ट्र गोमंतक पक्षाची युती होणार नाही. तर वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचने मात्र महाराष्ट्र गोमंतक पक्षाशी आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे. सुभाष वेलिंगकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडल्यानंतर आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्र गोमंत पक्षानेही भाजपसोबत युती न करण्याचे संकेत दिले आहेत. शिवाय, शिवसेनेनेही गोवा विधानसभा निवडणुकीत मोठ्या तयारीने उडी घेतल्याने एकंदरीतच भाजपला गोवा विधानसभा निवडणूक कठीण जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.