सायरस मिस्त्रींकडून टाटाच्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा
एबीपी माझा वेब टीम | 19 Dec 2016 10:30 PM (IST)
मुंबई : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी आज टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांवरील पदांचा राजीनामा दिलाय. कायदेशीर लढाई लढण्यासाठी आपण हे पाऊल उचलत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मिस्त्री यांनी टाटा केमिकल्स, टाटा पॉवर, इंडिया हॉटेल्स, टाटा मोटर्ससह सहा कंपन्यांमध्ये आपला राजीनामा पाठवलाय. एका व्हिडिओद्वारे त्यांनी आपला निर्णय जाहीर केलाय. 24 ऑक्टोबर रोजी मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं होतं. टाटा समुहातील अन्य कंपन्या मिस्त्री यांच्याविरोधात निर्णय जाहीर करणार होत्या. त्यासाठी उद्या या कंपन्यांची तातडीने बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच मिस्त्री यांनी आपला राजीनामा दिलाय. संबंधित बातम्या :