Odisha Government Revises School Timings : सध्या देशात उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे लोक हैराण झाले आहेत. या  वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शाळा सकाळी 6 ते 9 या वेळेत भरवण्यात येणार आहे. शासनाचा हा आदेश आजपासून लागू करण्यात आला आहे. दरम्यान, मध्य भारत आणि पश्चिम राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेटी लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


पश्चिम राजस्थान आणि विदर्भात उष्णतेची लाट
 
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे दक्षिण हरियाणा आणि पूर्व राजस्थानमध्ये रविवारी दुपारी झालेल्या पावसामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांच्या मते, पुढील पाच दिवस देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही. पश्चिम राजस्थान आणि महाराष्ट्रातील विदर्भाचा काही भाग वगळता पुढील पाच दिवस देशाच्या कोणत्याही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही, असे जेनामनी यांनी सांगितले. पश्चिम राजस्थानच्या काही भागात रविवारी उष्णतेची लाट होती. तर बिकानेरमध्ये तापमानाचा पारा 47.1 अंश सेल्सिअस, गंगानगरमध्ये 46.9 अंश सेल्सिअस, तर बारमेरमध्ये 46.8 अंश सेल्सिअस आणि फलोदीमध्ये 46.6 अंश सेल्सिअस होता. महाराष्ट्राच्या विदर्भातील ब्रम्हपुरीमध्ये 46.2, चंद्रपूरमध्ये 46 अंश सेल्सिअस होता.




येत्या दोन दिवसात वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या चार दिवसांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये धुळीचे वादळ, गडगडाटी वादळ आणि वाऱ्याचा वेग ताशी 50 किमी वाहण्याची शक्यता देखील हावामान विभागाने वर्तवली आहे.


जम्मूमध्ये कडक उष्णता
 
जम्मू-काश्मीरच्या बहुतांश भागात तापमान सामान्यपेक्षा काही अंशांनी जास्त राहिले आहे. रविवारी जम्मूमध्ये 40.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. जी हंगामाच्या सरासरीपेक्षा 4.7 अंशांनी जास्त होती. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमध्ये किमान तापमान 26.7  अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा 4.1 अंशने जास्त होते. तर दुसरीकडे, काश्मीर खोऱ्यात देील तापमानाचा पारा वाढला आहे. श्रीनगरमध्ये दिवसाचे तापमान 29 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान 11.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. जे आदल्या दिवशी अनुक्रमे 26.2 आणि 12 अंश सेल्सिअस होते. दरम्यान, हवामान खात्याने 3 ते 5 मे दरम्यान जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आमि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: