Coromandel Express Accident: ओडिशातील बालासोरमध्ये 2 जून रोजी बाहानागा रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनचा भीषण अपघात (Coromandel Express Accident) झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीला धडकल्याने मोठा अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस (Coromandel Express) हावड्याच्या शालिमार स्थानकावरून चेन्नईला धावते. पश्चिम बंगाल (West Bengal), ओडिशा (Odisha), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि तामिळनाडू (Tamilnadu) या चार राज्यांमधून ही एक्सप्रेस रोज धावते. हे सर्व झालं कोरोमंडल एक्सप्रेसबद्दल. परंतु तुम्ही कोरोमंडल कोस्टबद्दल (Coromandel Coast) कधी ऐकलं आहे का? कोरोमंडल कोस्ट हा भारताच्या दक्षिण-पूर्व किनारपट्टीचा एक प्रदेश आहे आणि कोरोमंडल एक्सप्रेस ही एक सुपरफास्ट ट्रेन आहे. दोघांचं कनेक्शन असं आहे की, कोरोमंडल एक्सप्रेस (Coromandel Express) ही कोरोमंडल किनार्‍याच्या बाजूने धावते.


कोरोमंडल किनारा


कोरोमंडल एक्सप्रेस ही कोरोमंडल किनारपट्टीला लागून धावते. त्यामुळे, पर्यटकांना सुंदर समुद्रकिनारे (Beautiful Beaches), हिरवीगार जंगले (Green Forests) आणि या भागातील अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळे (Historical and Spiritual Places) पाहण्याची संधी मिळते. कोरोमंडल किनारा (Coromandel Coast) हा भारतीय उपखंडातील दक्षिण-पूर्व किनारपट्टीचा प्रदेश आहे, जो सुमारे 22,800 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे. किनारपट्टीची सरासरी उंची 80 मीटर आहे.


कोरोमंडल किनाऱ्यावर शेती देखील होते


कोरोमंडल किनारा (Coromandel Coast) देखील एक प्रमुख कृषी प्रदेश आहे, ज्यामध्ये तांदूळ, कडधान्ये, ऊस, कापूस आणि भुईमूग ही मुख्य पिकं घेतली जातात. या भागात मासेमारी, शिपिंग आणि उत्पादन यासह अनेक उद्योग केले जातात. कोरोमंडल किनारपट्टीवर सुंदर लांब किनारे, हिरवीगार जंगले आणि अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळे आहेत, जे पर्यटकांना खूप आकर्षित करतात. पर्यटकांना भेट देण्यासाठी हे एक अद्भुत ठिकाण आहे. कोरोमंडल किनार्‍यावरील काही लोकप्रिय पर्यटन (Tourist Places) स्थळांबद्दल जाणून घेऊया.


चेन्नई, कोरोमंडल किनारा: तामिळनाडूची राजधानी चेन्नई हे एक प्रमुख सांस्कृतिक ठिकाण आहे. येथे अनेक संग्रहालये, मंदिरे आणि इतर ऐतिहासिक स्थळे आहेत.


महाबलीपुरम, कोरोमंडल किनारा: महाबलीपुरम हे एक शहर आहे, जे सातव्या आणि आठव्या शतकातील हिंदू मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. ज्यात किनाऱ्यालगतच्या मंदिरांचा समावेश आहे.


पाँडिचेरी, कोरोमंडल किनारा: पाँडिचेरी हे फ्रेंच वसाहती, वास्तुकला, समुद्रकिनारे आणि आश्रम यासाठी ओळखले जाणारे शहर आहे.


हेही वाचा:


Odisha Train Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशामध्ये,घटनास्थळी जाऊन घेतला परिस्थितीचा आढावा