नवी दिल्ली: नोटबंदीनंतर देशात आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे. नोटंबदीनंतर देशभरात आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत 91 लाखांनी वाढ झाली आहे.


2016-17 या आर्थिक वर्षात 5.7 कोटी लोकांनी आयकर भरला होता. दरम्यान, 2017-18 या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला 6.25 कोटी लोकांनी आयकर भरला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर 2017-18 आर्थिक वर्षाच्या शेवटी 7 कोटींपर्यंत हा आकडा पोहचेल असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, नोटबंदीनंतर याच गोष्टीची सरकारकडून अपेक्षा करण्यात येत होती. आता जीएसटी लागू झाल्यानंतरही सरकार याच गोष्टी अपेक्षा करत आहे.