राखी सावंत बुरखा घालून लपून छपून कोर्टात हजर!
एबीपी माझा वेब टीम | 07 Jul 2017 02:52 PM (IST)
लुधियाना : अभिनेत्री राखी सावंत बुरखा परिधान करुन लपूनछपून गुरुवारी पंजाबमधील लुधियाना कोर्टात हजर झाली. रामायणकार वाल्मिकी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर राखी सावंतविरोधात लुधियाच्या न्यायदंडाधिकारी कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोर्टात हजर झाल्यानतंर न्यायाधीश विश्व गुप्ता राखीला जामीन मंजूर केला. न्यायालयाने राखी सावंतविरोधात 2 जून रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी करुन, 7 जुलैआधी राखी सावंतला कोर्टात हजर करावं, असा आदेश लुधियाना पोलिस आयुक्तांना दिला होता. याआधी 9 मार्च रोजी राखीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. न्यायालयाने वारंवार समन्स बजावूनही राखी 9 मार्चला सुनावणीसाठी कोर्टात हजर राहिली नव्हती. लोकांच्या नजरा टाळण्यासाठी राखी बुरखा परिधान करुन कोर्टात पोहोचून आत्मसमर्पण केलं. कोर्टाने एक-एक लाख रुपयांच्या दोन जात मुचलक्यांवर राखीला जामीन मंजूर केला. त्यानंतर ती मुंबईला रवाना झाली.