गांधीनगर (गुजरात): काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्येच नवं आव्हान उभं केलं आहे. गुजरातच्या बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठात  नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया अर्थात एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघनटेचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपच्या अभाविप अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी संघटना तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे.


जनरल सेक्रेटरी (जीएस) आणि उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिंडेंट) या पदासाठी या निवडणुका झाल्या असून एकूण 16 हजार विद्यार्थ्यांनी यात मतदान केलं होतं.


मोदींच्या राज्यात, तेही त्यांनी निवडणूक लढवलेल्या मतदारसंघात काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयने हा ऐतिहासिक विजय मिळवला. जीएसच्या महत्वाच्या पोस्टवर एनएसयूआयच्या उमेदवाराने मोठ्या फरकाने विजय मिळवला. तर जीएस आणि व्हीपी या दोन महत्त्वाच्या पोस्टवर एबीव्हीपी चक्क तिसऱ्या स्थानावर फेकली गेली.

BLOG: भाजपसाठी 'कॅम्पस अलार्म'




दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमधील महत्त्वाच्या पदांवर तरुण कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे. प्रस्थापितांना थांबवत, नव्या आणि तरुण चेहऱ्यांना राहुल गांधींनी गुजरातमध्ये पदं दिली आहेत.

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं ट्विट


दरम्यान, काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या या विजयानंतर गुजरातचे काँग्रेस प्रभारी राजीव सातव यांनी अभिनंदन करणारं ट्विट केलं आहे.  उल्लेखनीय विजयाबद्दल एनएसयूआयचं अभिनंदन. हा विजय म्हणजे पंतप्रधान मोदींच्या गुजरातच्या तरुणाईचा कल भाजपविरोधी असल्याचं दिसतंय. गुजरात काँग्रेसचं अभिनंदन आणि अभिमान आहे, असं राजीव सातव यांनी म्हटलं आहे.





संबंधित बातम्या  

BLOG: भाजपसाठी 'कॅम्पस अलार्म'  

सिनेट निवडणूक : युवासेनेसमोर अभाविप आणि एनएसयूआयचं आव्हान  

ABVP ला झटका, दिल्ली विद्यापीठाचं अध्यक्षपद NSUI कडे  

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठावर चार वर्षांनंतर एनएसयूआयचा झेंडा