नवी दिल्ली : आपल्या अंधत्वावर मात करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत (सीएसई) उत्तीर्ण होणाऱ्या जयंत मंकलेची सरकार दरबारी लढाई सुरुच आहे. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगने (डीओपीटी) आता ही जबाबदारी दुसऱ्या मंत्रालयावर ढकलली आहे.


डीओपीटीचे मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत आणि नंतर डीओपीटीचे जॉईंट सेक्रेटरी विजय कुमार सिंह यांच्यासोबत जयंतची चर्चा झाली. ''ज्या तीन पोस्ट शिल्लक आहेत, त्या परराष्ट्र मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, अर्थमंत्रालय यांच्याकडून डीओपीटीला असं लेटर यायला पाहिजे, की ते अशा 75 टक्के अंध विद्यार्थ्याला पोस्ट द्यायला तयार आहेत,'' असं डीओपीटीकडून सांगण्यात आलं आहे.

मंत्रालयाचा रिप्लाय आल्यानंतरच आम्ही पुढची कारवाई करू शकतो, असं जॉईंट सेक्रेटरींनी सांगितलं आहे. हा रिप्लाय कधीपर्यंत येणार असं विचारल्यावर, “त्यांचे उत्तर आहे, आम्ही ते सांगू शकत नाही”, असं उत्तर देण्यात आलं.

''आत्ता माझी सध्याची जी स्थिती आहे त्याबाबत तुम्ही आम्हाला लेखी काही द्या, यावरही त्यांचं म्हणणं आहे की ते आम्ही नाही देऊ शकत,'' अशी माहिती जयंत मंकलेने दिली.

दरम्यान, ज्या तीन मंत्रालयांकडे डीओपीटीने बोट दाखवलं आहे, त्या तीनही मंत्रालयांनी या मुद्द्याकडे संवेदनशीलपणे पाहावं, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

https://twitter.com/supriya_sule/status/1033040451773726720

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना टॅग करुन सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केलं आहे.

https://twitter.com/supriya_sule/status/1033040612545781766

https://twitter.com/supriya_sule/status/1033040612545781766