Ayushman Bharat Scheme : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारकडून आरोग्य सेतू नावाचं अॅप लॉन्च करण्यात आले होते. आता केंद्र सरकारने आणखी एक डिजिटल पाऊल उचलले आहे. आरोग्य सेतू अॅपवर आयुष्यमान भारत योजनेचा युनिक क्रमांक जोडता येईल. जेआधीपासून आरोग्य सेतू अॅपवर आहेत, त्यांना 14 अंकाचा आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) क्रमांक मिळेल. या क्रमांकावरुन आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपचार घेतलेले जुने आणि आताचे मेडिकल रिपोर्ट मिळतील. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आयुष्मान भारत डिजिटल अभियान या त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या योजनेअंतर्गत भारत सरकारच्या आरोग्य सेतू या अत्यंत लोकप्रिय आरोग्यविषयक ॲपचे एकीकरण करण्याची घोषणा केली आहे. या एकीकरणामुळे 14 अंकी विशिष्ट आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक वापरण्याचे लाभ आता आरोग्य सेतू ॲपचे वापरकर्ते आणि त्यापलीकडे अनेकांना घेता येणार आहेत.
आयुष्यमान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत सध्या 16.4 कोटी ABHA क्रमांक आहेत. या सर्वांना आरोग्य सेतू अॅपवरवर जोडण्यात येणार आहे, असे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून (NHA) सांगण्यात आले आहे. आपल्या आधीच्या मेडिकल इतिहासामध्ये डॉक्टरांची अपाईंटमेंट, प्रिस्क्रिप्शन, लॅब रिपोर्ट, हॉस्पिटल रेकॉर्ड याचा समावेश असेल. आरोग्य सेतू वापरणारे 21.4 कोटी युजर्सला आता अॅपवरुनच आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) क्रमांक मिळेल.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे प्रमुख डॉ.आर.एस.शर्मा म्हणाले: आरोग्य सेतूचे आयुष्मान भारत डिजिटल अभियानासोबत एकत्रीकरण झाल्यामुळे, आपण आता अभियानाचे लाभ आरोग्य सेतू वापरणाऱ्यांना मिळवून देता येतील आणि त्यांची योग्य परवानगी घेऊन त्यांना डिजिटल आरोग्य परिसंस्थेशी जोडून घेता येईल. आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक तयार करणे ही सुरुवात असून आपण लवकरच तुमच्या आरोग्यविषयक डिजिटल नोंदी बघण्याची सुविधा देखील सुरु करू.”
आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक तयार करणे ही अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. वापरकर्त्याला त्याचा आधार कार्ड क्रमांक आणि नाव, जन्मवर्ष (किंवा जन्मतारीख), लिंग आणि पत्ता (एकदा आधार ओटीपी द्वारे वापरकर्त्याची पडताळणी झाली की पत्ता आपोआप दिसू लागेल) यांसारख्या लोकसंख्याविषयक काही मुलभूत तपशीलांची माहिती वापरून हा क्रमांक मिळवता येईल. जर वापरकर्त्याला आधार क्रमांक वापरायचा नसेल तर वाहन चालविण्याचा परवाना अथवा मोबाईल क्रमांक वापरून देखील आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक मिळविता येईल. वापरकर्त्याला त्याचा आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक https://abdm.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करून किंवा https://play.google.com/store/apps/details?id=in.ndhm.phr या आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक ॲपवरुन मिळवता येईल अथवा आयुष्मान भारत डिजिटल अभियानासोबत एकत्रित करण्यात आलेल्या इतर ॲपचा वापर करून मिळवता येईल.
कोण करु शकतं नोंदणी?
असे कामगार, ज्यांचं वय 16 ते 59 वर्षे आहे आणि कर्मचारी भविष्य निर्वाह संस्था (EPFO) किंवा राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) जे या सुविधांचे लाभार्थी नाहीत.
असे कामगार, जे आयकर भरण्यासाठी पात्र नाहीत.
असे कामगार, जे सरकारी कर्मचारी नाहीत.
आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी एक युनिक हेल्थ कार्ड तयार केला जातो. हे कार्ड पूर्णपणे डिजिटल असेल आणि आधार कार्डसारखे दिसेल. आधार कार्डमध्ये जसा नंबर असतो, तशाप्रकारे या हेल्थ कार्डावर एक नंबर असेल, ज्याच्या आधारावर व्यक्तीची ओळख आरोग्य क्षेत्रात सिद्ध होईल. हा क्रमांक आता आरोग्य सेतू अॅपवर जोडला जाणार आहे. म्हणजेच तुमच्या आरोग्याची कुंडली आता आरोग्य सेतू अॅपवर मिळणार आहे.
आधार, मोबाइल नंबर गरजेचा -
ज्या व्यक्तीचे युनिक हेल्थ कार्ड नोंदणी करण्यासाठी आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर घेतला जाईल. याच्या मदतीने हे युनिक हेल्थ कार्ड तयार केला जाईल. यासाठी, सरकारद्वारे एक आरोग्य प्राधिकरण स्थापन केले जाईल, जे व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित सर्व प्रकारचा डेटा गोळा करेल.