नवी दिल्लीः महात्मा गांधींच्या हत्येसाठी संघाला जबाबदार धरणाऱ्या वक्तव्यावरुन राहुल गांधींवर सुप्रीम कोर्टात जी केस सुरू आहे, त्यात आज मोठा ट्विस्ट आला. राहुल गांधींनी गांधी हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नाही तर संघाशी निगडीत काही लोकांवर आरोप केला होता, असं वकील कपिल सिब्बल यांनी आज कोर्टात स्पष्ट केलं आहे.

 

राहुल गांधी यांच्या वतीने बाजू मांडताना वकील सिब्बल यांनी आपली बाजू स्पष्ट केली. यानंतर काँग्रेसचा ही केस लढण्याचा निर्धारही मावळल्यात जमा आहे. अर्थातच या माघारीनंतर केस मिटण्याची चिन्हं आहेत.

 

काय आहे वाद?

 

2014 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीतील सभेत महात्मा गांधींच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधींच्या या आरोपावर आक्षेप घेत, त्यांच्याविरोधात कोर्टात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता.

 

संबंधित बातम्याः

राहुल गांधीना तात्पुरती मुभा, ८ मेला भिवंडी कोर्टात हजर राहण्याचे आदेश


संघाच्या मानहानी खटल्याची सुनावणी लांबणीवर, भिवंडी कोर्टात हजेरीनंतर राहुल गांधी रवाना