बंगळुरु: रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताकडून सहभागी झालेली धावपटू सुधा सिंहला स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. यामुळे ती पुढील दोन महिने कोणत्याही स्पर्धेत धावू शकणार नाही.


 

झिका वायरसचं संक्रमण झालं असल्याचा संशय आल्यानं सुधावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण तिला स्वाइन फ्लूची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय खेळ प्राधिकरणच्या अधिकारी डी. सरला म्हणाल्या की, 'सुधा सिंहला झिका वायरसची लागण झाली की नाही याची पडताळणी सुरु होती. मात्र तिला एच1एन1ची म्हणजेच स्वाइन फ्लूची लागण झाली आहे.'
सुधा रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 3000 मी. स्टीपलचेस स्पर्धेत सहभागी झाली होती. मागील आठवड्यात रिओहून परतल्यानंतर तिला ताप आणि अंगदुखीचा त्रास जाणवू लागला.

 

सुधाला 20 ऑगस्ट रोजी बंगळुरुतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.