पेट्रोल-डिझेलनंतर विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ
एबीपी माझा वेब टीम | 02 May 2016 02:09 AM (IST)
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ केल्यानंतर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणखी एक झटका दिला आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 18 रुपयांनी वाढ करण्यात आली. जागतिक बाजारात किमती वाढल्याने ही दरवाढ करावी लागल्याचं सरकारनं म्हटलं आहे. सध्या ग्राहकांना वर्षाला 12 सिलेंडरवर अनुदान मिळते. विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीत वाढ केल्याने त्यासाठी आता 527.50 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये 82.50 रुपयांनी, मार्चमध्ये 61.50 रुपयांनी तर एप्रिलमध्ये 4 रुपयांनी विनाअनुदानित सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या.