सीबीएससीनं नीट परीक्षेसाठी 25 वर्षाची मर्यादा घातली होती. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. याचप्रकरणी आज सुनावणी करण्यात आली. तेव्हा सुप्रीम कोर्टानं वयोमर्यादा हटवण्याचा निकाल दिला. या निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे.
बऱ्याचदा अनेक विद्यार्थी पदवीनंतर नीट देण्यासाठी तयारी करतात. त्यामुळे 25 वर्ष ही वयोमर्यादा हटविण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली होती. दरम्यान, मेडिकल कांउसिल ऑफ इंडियानं देखील म्हटलं होतं की, 'या वयोमर्यादेमुळे देशात डॉक्टरांची कमतरता आहे.'
'नीट परीक्षेची संपूर्ण तयारी झाली असून पुन्हा मोठ्या प्रमाणात परीक्षेची तयारी करावी लागेल.' असा युक्तीवाद सीबीएससीच्या वकिलांनी कोर्टात केला.
सुप्रीम कोर्टानं हा निकाल देताना स्पष्ट केलं की, 'जर याआधी इतर कोणत्या कोर्टानं या वर्योमर्यादेविषयी निकाल दिला असल्यास तो निर्णय देखील रद्द होईल.' 'नीट'ची यंदाची परीक्षा 7 मे रोजी होणार आहे.
संबंधित बातम्या: