मालमत्ता आधारशी लिंक करण्याचा विचार नाही : केंद्र
एबीपी माझा वेब टीम | 19 Dec 2017 10:20 PM (IST)
मालमत्ताही आता आधारशी लिंक कराव्या लागणार, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यावर केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यात आला.
प्रातिनिधिक फोटो
नवी दिल्ली : मालमत्ता आधार कार्डशी लिंक करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही, अशी माहिती संसदेत गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली. मालमत्ताही आता आधारशी लिंक कराव्या लागणार, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यावर केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यात आला. दरम्यान, असा प्रस्ताव विचाराधीन नसला तरी मालमत्ता नोंदणी अधिनियम 1908 च्या कायद्यानुसार, मालमत्तांच्या नोंदणीसाठी आधारचा वापर करावा, असे आदेश ग्रामविकास मंत्रालयाने राज्यांना दिले असल्याचंही हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं. मालमत्तांच्या खरेदी व्यवहारांसाठी आधार अनिवार्य करणं ही चांगली कल्पना आहे. बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याचा तर नियम करण्यात आलाच आहे. मालमत्तांशी आधार लिंक करण्याचीही वेळ येऊ शकते, असं हरदीप सिंह पुरी यांनी नोव्हेंबरमध्ये म्हटलं होतं.