तात्काळ तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत रखडलं
एबीपी माझा वेब टीम | 05 Jan 2018 12:58 PM (IST)
राज्यसभेच्या तीन खासदारांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना निरोप दिला जाणार आहे. त्यातच अधिवेशनाचं कामकाज संपेल.
नवी दिल्ली : तात्काळ तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत रखडलं आहे. तीन खासदारांच्या निरोप समारंभामुळे या विधेयकाचा संसदेत खोळंबा झाला. गेल्या तीन दिवसांपासून या विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरु आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज तरी हे विधेयक मंजूर होईल, अशी आशा होती. मात्र राज्यसभेच्या तीन खासदारांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना निरोप दिला जाणार आहे. त्यातच अधिवेशनाचं कामकाज संपेल. त्यामुळे हे विधेयक मंजूर होण्यासाठी पुढच्या अधिवेशनाची वाट बघावी लागणार आहे.