हैदराबाद : तेलंगणामधील निझामाबादमध्ये एका युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. व्हॉटसअॅपवर पोस्ट करण्यासाठी व्हिडीओ शूट करताना ही घटना घडली आहे.

 

निझामाबादमधील श्रीनिवास नावाच्या तरूणाचा या घटनेत मृत्यू झाला असून तो एक्साईज कॉन्स्टेबलची परीक्षाही दिली होती. त्याने तलावात पोहायला उतरताना आपल्या मित्राला मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्यास सांगीतलं होतं. तलावात उडी घेतल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने काही क्षणातच तो बुडू लागला. यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

 

मागच्या काही दिवसात सेल्फी आणि व्हॉटसअपसाठी व्हिडीओ काढताना बऱ्याच लोकांचा बळी गेला आहे. तसेच पोकेमॉन गो गेम खेळतानाही हलगर्जीपणामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 

पाहा व्हिडीओ :