जीएसटी विधेयक लोकसभेत संमत झाले असून राज्यसभेत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी याला विरोध केल्यामुळे ते रखडले आहे. या विधेयकावर संमती मिळवण्यासाठी काँग्रेसची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. आज राज्यसभेत पुन्हा हे विधेयक मांडण्यात येणार आहे.
देशातील आर्थिक सुधारणांसाठी मोदी सरकार जीएसटी विधेयक संसदेत संमत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. भाजपची वैचारिक मतभेद असलेल्या पक्षांनीही जीएसटी विधेयकाला समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, काँग्रेस आपल्या मागण्यांवर अडून बसली आहे. त्यामुळे आज हे विधेयक राज्यसभेत संमत झाल्यास भारतात आर्थिक क्षेत्रात मोठे बदल होणार आहे. तसेच व्हॅट आणि एक्साइजही रद्द होणार आहे.
संबंधित बातम्या