नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर रवाना होणार आहेत. इस्लामाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सार्क संमेलनात ते सहभागी होणार आहेत.


 

पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये 3 आणि 4 ऑगस्ट रोजी सार्क देशांच्या गृह मंत्र्यांची बैठक होणार आहे. आज गृह सचिव स्तारावरील चर्चा होणार असून गुरूवारी गृह मंत्र्याची बैठक होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये वाढता तणाव आणि पठाणकोट एअरबेस हल्ल्यानंतर कोणत्याही केंद्रीय मंत्र्याचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा आहे. या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान दरम्यान काय चर्चा होणार याकडे सर्वांच लक्ष असेल.

 

जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याने निष्पाप काश्मीरी लोकांच्या हत्येस राजनाथ सिंह यांना जबाबदार धरले आहे. जर राजनाथ सिंह इस्लामाबादला या संमेलनासाठी आले तर देशभर आंदोलन करण्याचा इशारा त्याने दिला आहे.

 

 

जिथे पूर्ण पाकिस्तान काश्मीरप्रश्नी आंदोलन करत असताना पाकिस्तान सरकार काश्मीरी लोकांची हत्या करणाऱ्या राजनाथ सिंह यांचं स्वागत करत आहे. ही बाब काश्मीरी लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्यासारखं असल्याचा आरोप हाफिज सईदने केला आहे.