नवी दिल्ली: कोरोना काळातील केलेल्या उपाययोजना, लसीकरण आणि नागरिकांचे आरोग्य या विषयावर पंतप्रधान मोदी आज नीती आयोगाची बैठक घेणार आहेत. नीती आयोगाची ही सहावी बैठक असेल. कोरोना काळातील आव्हाने आणि सरकारच्या उपाययोजना या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्वाची असेल.


या बैठकीत कोरोनाच्या लसीकरणासोबत अर्थव्यवस्था आणि कामगार कायद्यातील सुधारणांवर चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये नीती आयोगाचे सर्व सदस्य सामील होणार आहेत. या बैठकीसाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे उपस्थित राहतील का नाही याची शंका आहे.


Petrol and Diesel prices Today : पेट्रोल डिझेलच्या दरात सलग बाराव्या दिवशी वाढ


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बिहारच्या संबंधी काही महत्वाचे विषय ते नीती आयोगाच्या बैठकीत मांडणार असल्याचं सांगण्यात येतंय. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील ही सहावी बैठक असेल. योजना आयोग बंद केल्यानंतर नीती आयोगाची स्थापना करण्यात आली होता. 8 फेब्रुवारी 2015 साली नीती आयोगाची पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती.


कृषी, पायाभूत सुविधा, मानव संसाधन विकास, मूलभूत सुविधा आणि आरोग्य हे विषय या बैठकीच्या अजेंड्यावर असतील असं सांगण्यात येतंय. या बैठकीला सर्व केंद्रीय मंत्री, नीती आयोगाचे पदसिद्ध सदस्य, नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि सदस्य आणि सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील. कोरोनाचा संक्रमणामुळे गेल्या वर्षी नीती आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली नव्हती.


World Day of Social Justice: का साजरा केला जातो जागतिक सामाजिक न्याय दिन? भारतीय राज्यघटनेत त्याचं काय महत्व आहे