Health Index : देशात सर्वात चांगली आरोग्य सेवा देण्यात केरळचा पहिला नंबर लागला आहे तर उत्तर प्रदेश सर्वात खराब आरोग्य सेवा देणारं 19 वं राज्य ठरलं आहे. नीती आयोगानं हेल्थ इंडेक्स रँकिंग जारी केली. यामध्ये दक्षिणेकडील राज्यांनी बाजी मारली आहे. महत्त्वाचे म्हणजे
महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेतही सुधारणा झाल्याचं स्पष्ट झाले आहे.
देशात आजपर्यंत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण ज्या राज्यात सापडले त्या केरळ राज्याचा हेल्थ इंडेक्समध्ये पहिला क्रमांक आला आहे. आरोग्यसेवा देण्यात केरळ चारवेळा अव्वल स्थानावर आहे. 2015-16, 2017-18 आणि 2018-19 या साली केरळ पहिल्या स्थानावर आहे. केरळनंतर तामिळनाडू आणि तेलंगाणाचा नंबर लागतो. देशाचे सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशची परिस्थिती सर्वात खराब आणि स्थान खालचे असल्याची आकडेवारी निती आयोगाने मांडली आहे.
सर्वात चांगली आरोग्य सेवा देणारी राज्ये
- केरळ
- तामिळनाडू
- तेलंगणा
- आंध्र प्रदेश
- महाराष्ट्र
- गुजरात
- हिमाचल प्रदेश
- पंजाब
- कर्नाटक
- छत्तीसगड
- हरियाणा
- आसाम
- झारखंड
- ओडिशा
- उत्तराखंड
- राजस्थान
- मध्य प्रदेश
- बिहार
- उत्तर प्रदेश
छोट्या राज्यांमध्ये चांगल्या आरोग्य सेवा देण्याच्या बाबतीत मिझोरम पहिल्या क्रमांकावर , त्रिपुरा दुसऱ्या आणि नागालँड खालच्या स्थानावर आहे. तर केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली प्रथम, चंदीगड दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे. ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहिला तर दरवर्षी दिल्लीचा क्रमांक घसरत आहे.
चार फेऱ्यात केरळचा स्कोअर 82.20
निती आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, हेल्थ इंडेक्सने चार फेऱ्यांमध्ये सर्वहेक्षण करण्यात आले असून त्यानंतर गुण देण्यात आले आहे. चारही फेऱ्यात केरळ टॉपवर आहे. केरळचे गुण 82.20 आहे. तर तामिळनाडूचा 72.42 आहे. या इंडेक्समध्ये सप्वाधिक कमी गुण उत्तरप्रदेशचा 30.57 आहे. या रिपोर्टनुसार राजस्थान सर्वात खराब आरोग्य सेवा देणारे राज्य ठरले आहे. ओव्हरऑल परफॉर्मन्स आणि इन्क्रिमेंटल परफॉर्मन्समध्ये कामगिरी खराब राहिली आहे. हेल्थ इंडेक्स तीन इंडिकेटरवर तयार करण्यात आले. पहिले आऊटकम, दुसरा गव्हर्नस अँड इन्फोर्मेशन आणि तिसरा इनपुट अँड प्रोसेस यावर आधारित आहे.
TOP 50 : महत्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक : 27 नोव्हेंबर 2021 : ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :