मुंबई: मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे यंदा कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी मुंबई-पुणे महामार्गाने कोकणात जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या सगळ्या गाड्यांचा टोल माफ करावा, अशी मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विटरवर ट्वीट केलं आहे.


 

सरकारने टोल माफ करण्याची मागणी मान्य करावी, अन्यथा कोकणी माणसाच्या हक्कासाठी काहीही करु, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात टोलच्या मुद्द्यावरुन पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

 

 

 

दरम्यान, मुंबई एंट्री पॉईंटवरील टोल बंद करण्याची मागणी गेले अनेक दिवस सुरु आहे. त्यामुळे आता राज्य सरकार नितेश राणेंच्या या मागणीवर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.