मुंबई : दहीहंडीत 18 वर्षांखालील मुलांच्या सहभागाबद्दल सर्वोच्च न्यायालयात आज निकाल येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडून दहीहंडीची उंची आणि त्यातील लहान मुलांच्या सहभागावर स्पष्टीकरण मागितलं होतं.


 

 

सर्वोच्च न्यायालय 2014 चा अंतरिम आदेश पुन्हा लागू करण्याची शक्यता आहे. 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती, यानुसार दहीहंडीची उंची 20 फुटांपेक्षा जास्त ठेवण्यावर आणि 18 वर्षांखालील मुलांच्या सहभागावरही बंदी आणण्यात आली होती. 14 ऑगस्ट 2014 ला सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर अंतरिम आदेश आणत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

 

 

सर्वोच्च न्यायालयाने यावर विस्तृत आदेश न देता या प्रकरणाची सुनावणी बंद केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाचा जुना आदेश मानायचा की सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश मानायचा याबाबत सरकारच्या मनात संभ्रम आहे. याच धर्तीवर आज दहीहंडी प्रकरणात काही ठोस निर्णय येण्याची शक्यता आहे.