नवी दिल्ली : मानव संसाधन विकास मंत्रालयाने (HRD) देशातील उच्च शैक्षणिक संस्थांची क्रमवारी (NIRF 2019 Rankings) घोषित केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोत्कृष्ट 10 विद्यापीठं आणि सर्वोत्कृष्ट 10 अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. NIRF 2019 Rankings मध्ये विद्यापीठांच्या यादीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरुने पहिला क्रमांक पटकावला आहे तर टॉप 10 विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ या एकमेव विद्यापीठाला स्थान मिळवता आले आहे. पुणे विद्यापीठाचा 9 वा क्रमांक आहे.


अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या यादीत आयआयटी मद्रासने पहिला क्रमांक पटकावला आहेत. तर या या यादीत आयआयटी बॉम्बे या महाराष्ट्रातल्या एकमेव अभियांत्रिकी संस्थेला स्थान मिळवता आले आहे. ही क्रमवारी ठरवण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅन्किंग फ्रेमवर्कने (NIRF)संपूर्ण भारतातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालय, मॅनेजमेंट, फार्मसी, मेडिकल, आर्किटेक्चर आणि विधी महाविद्यालयांचा अभ्यास केला होता.

टॉप 10 विद्यापीठं
1. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरु
2. जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली
3. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, वाराणसी
4. अन्ना युनिव्हर्सिटी, चेन्नई
5. युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद, हैदराबाद
6. जादवपूर युनिव्हर्सिटी, कोलकाता
7. युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, दिल्ली
8. अमृता विश्व विद्यापीठम, कोईम्बतूर
9. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
10. अलीगड मुस्लीम युनिव्हर्सिटी, अलीगड

टॉप 10 अभियांत्रिकी महाविद्यालय अथवा संस्था
1. आयआयटी मद्रास
2. आयआयटी दिल्ली
3. आयआयटी बॉम्बे
4. आयआयटी खडगपूर
5. आयआयटी कानपूर
6. आयआयटी रुडकी
7. आयआयटी गुवाहाटी
8. आयआयटी हैदराबाद
9. अन्ना युनिव्हर्सिटी, चेन्नई
10. एनआयटीटी तिरुचिरापल्ली (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)