नवी दिल्ली : मानव संसाधन विकास मंत्रालयाने (HRD) उच्च शैक्षणिक संस्थांची क्रमवारी (NIRF 2019 Rankings) घोषित केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था, सर्वोतृष्ट विद्यापीठं आणि सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या यादीमध्ये पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाला 10 वे स्थान प्राप्त झाले आहे तर मुंबई विद्यापीठाला पहिल्या 100 मध्येदेखील स्थान मिळवता आलेले नाही.


सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाला नववे स्थान प्राप्त झाले आहे तर मुंबई विद्यापीठ 81 व्या स्थानी आहे. विद्यापीठांच्या यादीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरुने पहिला क्रमांक पटकावला आहे तर टॉप 10 विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील केवळ पुणे विद्यापीठाला स्थान मिळवता आले आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या यादीत आयआयटी मद्रासने पहिला क्रमांक पटकावला आहेत. तर या या यादीत आयआयटी बॉम्बे या महाराष्ट्रातल्या एकमेव अभियांत्रिकी संस्थेला स्थान मिळवता आले आहे. आयआयटी बॉम्बेला तिसरा क्रमांक मिळाला आहे. ही क्रमवारी ठरवण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅन्किंग फ्रेमवर्कने (NIRF)संपूर्ण भारतातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालय, मॅनेजमेंट, फार्मसी, मेडिकल, आर्किटेक्चर आणि विधी महाविद्यालयांचा अभ्यास केला होता.

NIRF मधील (नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क) राज्यातील शैक्षणिक संस्था

आयआयटी बॉम्बे - 04
सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - 17
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्यूकेशन अँड रिसर्च, पुणे - 23
होमी भाभा इन्स्टिट्यूट, मुंबई -30
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स - 56
डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे - 70
सिम्बॉयसिस इंटरनॅशन पुणे - 82
नरसी मोनजी, मुंबई - 83
भारती विद्यापीठ, पुणे - 88
कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे, - 91
दत्ता मेघे मेडिकल सायन्स, वर्धा - 92

NIRF मधील (नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क) राज्यातील विद्यापीठ आणि रँकिंग

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - 10
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई- 15
होमीभाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई - 17
डी. वाय. पाटील पुणे विद्यापीठ, पुणे - 46
सिम्बॉयसिस इंटरनॅशन युनिव्हर्सिटी, पुणे - 56
नरसी मोनजी महाविद्यालय, मुंबई - 57
भारती विद्यापीठ, पुणे - 62
मुंबई विद्यापीठ - 81
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - 85
डी.वाय,. पाटील विद्यापीठ- 88

मुंबई विद्यापीठाने NIRF RANKING मध्ये बरीच सुधारणा केली आहे. यामध्ये मुख्यत: रिसर्च पब्लिकेशन, पेटंट, रिसर्च फंडिंग आणि पासिंग पर्सेंटेज याचा समावेश आहे. आपल्या डेटा आणि डाक्यूमेंटेशनसह उर्वरित इतर निकषांमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी विद्यापीठातील प्राध्यापकांसह सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या सहकार्याने रॅंकिंगमध्ये अजून सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ कसोशीने प्रयत्न करणार आहे. - प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ