नवी दिल्ली : निर्भयाच्या आई आशादेवी यांचा कोर्टात बांध फुटल्याचं पाहायला मिळालं. माझा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडत चालल्याची तक्रार त्यांनी कोर्टाकडे केलीय. दोषींची शिक्षा कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, हे कोर्टाला कळत नाही का? असं उद्विग्न होत त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय.


दरम्यान, या प्रकरणातील एक दोषी पवन गुप्ता याला न्यायालयात बाजू मांडण्यासाठी कायदेशीर मदत देण्यास न्यायालयाने तयारी दर्शविली. कोणताही वकील आमची बाजू मांडण्यास तयार नसल्याचे पवन गुप्तांच्या वडिलांनी न्यायालयात सांगितले. पवनच्या वतीने उशीरा झाल्याबद्दल अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, पवनने आपला पूर्वीचा वकील काढून टाकला आहे आणि नवीन वकील मिळविण्यासाठी आपल्याला वेळ हवा आहे.


न्यायालयात बाजू मांडताना आशादेवी म्हणाल्या, मी या न्यायालयात येत आहे. दोषींना त्यांच्या कायदेशीर मार्गांचा अवलंब करता यावा, याची मी सातत्याने वाट पाहते आहे. पीडितेची आई म्हणून मलाही काही अधिकार आहेत. यासाठीच मी आता चारही दोषींना तातडीने फाशी दिली जावी, अशी मागणी करीत आहे. त्यासाठी मी त्यांचे डेथ वॉरंट लवकरात लवकर काढावे अशी मागणी करीत आहे.

निर्भयाच्या वडिलांनीही पवन गुप्ताला कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याला विरोध केला. पण न्यायालय कायद्याप्रमाणेच चालेल असे सांगत न्यायालयाने मदत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.

Nirbhaya Rapist Death Sentence | दिल्ली निर्भया बलात्काराप्रकरणी चारही दोषींना एकत्र फाशी देणार - दिल्ली हायकोर्ट



संबंधित बातम्या :

निर्भया प्रकरण : तिहार जेल प्रशासनाकडून नवीन डेथ वॉरंटसाठी कोर्टात अर्ज