नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाने नव्याने डेथ वॉरंट जारी केलंय. त्यानुसार तीन मार्चला सकाळी सहा वाजता निर्भयाच्या दोषींना फासावर चढवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. यापूर्वी 31 जानेवारीला दिल्लीच्या पटियाला न्यायालयानं अनिश्चित काळासाठी दोषींच्या फाशीला स्थगिती दिली होती. निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश कुमारची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्यानंतर या सर्व आरोपींना एक फेब्रुवारीला फाशी होण्याचे निश्चित झाले होते. मात्र, पटियाला कोर्टाच्या निर्णयाने या नराधमांची फाशी टळली होती. आता पटियाला हाऊस कोर्टाने फ्रेश डेथ वॉरंट जारी केलंय.


मुकेश कुमार सिंह(वय 32), पवन गुप्ता(25), विनय कुमार शर्मा(26) आणि अक्षय कुमार(31) अशी या दोषींची नावं आहेत. आपल्याकडे अजूनही कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचा दावा दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी केलाय. दोषींच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, अक्षयसाठी ते नवी दया याचिका करणार आहेत. पवनकडेही क्युरेटीव्ह पिटिशन आणि राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.

BLOG : 'ती' सुटली, आपल्यातल्या आगीचं काय?

निर्भयाच्या आई-वडिलांनी 11 फेब्रुवारीला दोषींविरुद्ध डेथ वॉरंट काढण्यासाठी याचिका दाखल केली होती. यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयानं डेथ वॉरंटमध्ये 22 जानेवारीला दोषींना फासावर लटकावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा एक फेब्रुवारी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार होती. परंतु, न्यायालयानं 31 जानेवारीला एका याचिकेवर सुनावणी करताना या शिक्षेची अंमलबजावणी थांबवली होती.

Nirbhaya Case : दोषींची फाशी लांबत असल्यानं निर्भयाच्या आईचा कोर्टातच बांध फुटला

आता अजून विलंब नको -
यापूर्वी फाशीला स्थगिती दिल्याने निर्भयाची आई आशादेवी यांचा कोर्टातच बांध फुटल्याचं पाहायला मिळालं. माझा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडत चालल्याची तक्रार त्यांनी कोर्टाकडे केली. दोषींची शिक्षा कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, हे कोर्टाला कळत नाही का? असं उद्विग्न होत त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान, आजच्या निर्णयाने त्या खूश असून दोषींना लवकर फासावर चढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलीय.

BLOG : कायदे बदलून महिलांवरील अत्याचार थांबतील का?

काय होती घटना -
दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये सहा जणांनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर, तिला आणि त्याच्या मित्राला चालत्या बसमधून फेकून दिलं. नंतर पोलिसांनी निर्भयाला रुग्णालयात आणले. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर तिला सिंगापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. 29 डिसेंबर 2012 रोजी, सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू असताना निर्भयाचा मृत्यू झाला. एक सप्टेंबर 2013 रोजी कनिष्ठ कोर्टाने चार दोषी पवन गुप्ता, विनय शर्मा, मुकेश आणि अक्षय सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

Hinganghat Nirbahya | मी हिंगणघाटची लेक बोलतेय! जाता जाता काय म्हणाली निर्भया? स्पेशल रिपोर्ट