मुंबई : जगात सर्वात जास्त पगार घेणाऱ्या सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पोरेशनचे अध्यक्ष निकेश आरोडा यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बुधवारी होणाऱ्या ३६ व्या वार्षिक बैठकीनंतर आरोडा अधिकृतरित्या आपल्या पदाची सुत्रे परत करतील. वारंवार सीइओपदाने हुलकावणी दिल्याने पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिली.

 

सॉफ्टबँकच्या म्हणण्यानुसार, संचालक आणि सीइओ मासायोशी यांना बँकेला निश्चित कालावधीमध्ये सर्वच क्षेत्रात बँकेला आघाडीवर न्यायचे होते. मात्र, यासाठी आरोडा यांना अजून कालावधी हवा होता.

 

दरम्यान, गूगलचे पूर्व एक्झिक्यूटिव्ह राहिलेले आरोडा यांच्यावर संशयित व्यवहार आणि खराब परफॉमन्सचे आरोप होते. आरोडा यांचा राजीनामा हा त्यांना विशेष तपास समितीने क्लीन चीट दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी दिला आहे.

आरोडा यांना २०१५-१६ या आर्थिक वर्षात बँकेने ७.३ कोटी डॉलर म्हणजे एकूण ५०० कोटी पगार दिला होता.