मुंबई : जुलै महिन्यात बँकांची कामं करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण जुलै महिन्यात जवळपास 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे याच महिन्यात बँकांची कामं आटोपून घेण्याचा सल्ला दिला जात आहे.


 

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काही बँकांच्या विलीनीकरण होणार आहे. याविरोधात स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूरच्या कर्मचाऱ्यांचं 12 आणि 28 जुलै रोजी देशव्यापी संप आहे. याशिवाय ऑल इंडिया बँक एम्पॉईज असोसिएशनचाही संप आहे. त्यामुळे जुलै महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार आहेत.

 

 

तर प्रत्येक महिन्याप्रमाणे पहिल्या आणि चौथ्या शनिवार, रविवारी सुट्टी निश्चित आहे. तसंच 6 जुलै रोजी ईदची सुट्टी आहे.

 

 

एसबीआय वगळता ऑल इंडिया बँक एम्पॉईज असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनच्या आव्हानानंतर एसबीबीजेसह इतर बँकांचा 13 जुलै रोजी देशव्यापी संप आहे. तर 29 जुलै रोजी युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियनने आव्हान दिल्यानंतर एसबीबीजेसह अन्य सर्व बँकांचा बंद राहिल.

 

 

कशा असतील सुट्ट्या?

याशिवाय 2 जुलैला पहिला शनिवार आणि 23 जुलैला चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. तर 3, 10, 17, 24 आणि 31 जुलै रोजी रविवारची सुट्टी असेल. 6 जुलै रोजी ईदची सुट्टी आहे. त्याचबरोबर 12 आणि 28 जुलैला स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूरचा संप आहे. तसंच 13 जुलै रोजी देशव्यापी संपामुळे बँक बंद राहतील. 29 जुलै रोजी युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियनचा एक दिवसाचा बंद असल्याने बँकांचं कामकाज होणार नाही. अशाप्रकारे जुलै महिन्यात असे एकूण 12 दिवस आहेत, जेव्हा कामकाज होणार नाही.

 

 

जुलै महिन्यात 2,3,6,10,12,13,17,23,24,28,29,31 या तारखांना बँका बंद राहतील. त्यामुळे तुम्ही या तारखा लक्षात घेऊन बँकांचं काम आटोपून घ्या, जेणेकरुन तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही.