नवी दिल्लीः एनजीटी अर्थात राष्ट्रीय हरित लवादाने जुन्या वाहनांसंबंधी हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. 10 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची पुनर्नोंदणी करण्यात येणार नाही. त्यामुळे आता रस्त्यावरुन 10 वर्षांपेक्षा जुन्या गाड्या हद्दपार होणार आहेत.
आरटीओ कार्यालयांनी वाहनांची सर्व माहिती वाहतूक पोलिसांना द्यावी आणि पोलिसांनी 10 वर्ष जुन्या वाहनांवर कारवाई करावी, असे निर्देश एनजीटीने दिले आहेत. या नियमांची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार आहे.
वाहनांच्या कर्कश हॉर्नवर बंदी
एनजीटीने या निर्णयासोबतच ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांवर लावण्यात येणाऱ्या कर्कश हॉर्नवरही बंदी आणली आहे. दुचाकींनाही हा नियम लागू असेल, असं एनजीटीने सांगितलं आहे. या निर्देशांमुळे वाहतूक पोलिसांची जबाबदारी वाढणार आहे.